नाशिक बंदबाबत अफवा पसरवल्यास गुन्हा दाखल करणार- जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक बंदबाबत अफवा पसरवल्यास गुन्हा दाखल करणार- जिल्हाधिकारी मांढरे

प्रतिनिधी | नाशिक

राज्य सरकारने लॉकडाऊनचा चौथा टप्पा घोषित केल्यानंतर आर्थिक व्यवहारांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक नियम अटी शिथील केल्या असून मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील दुकाने साफसफाई साठी सुरू करण्यास परवानगी देऊ केली आहे. एकीकडे आमचा जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असताना काही व्यक्तींच्याकडून सोशल मीडियात लॉकडाऊनबाबत अफवा पसरवून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची तंबी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.

राज्य सरकारने लॉक डाऊन घोषित केल्यानंतर उद्यापासून (दि. २२) अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. या आदेशात लॉकडाऊन ३ प्रमाणेच सर्व बाबी सुरू राहणार आहेत. शिवाय अजूनही काही बाबीवरील बंधने काहीशी शिथिल केली आहेत . जसे मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील दुकाने स्वछता, यंत्र दुरुस्ती आदी बाबींसाठी सुरू ठेवता येतील.

खासगी, सरकारी सर्व बांधकामे, पावसाळा पूर्व बांधकामे सुरू करता येणार विद्यापीठ, महाविद्यालयात पेपर तपासणी, निकाल ची कामे करण्यासठी १० टक्के कर्मचारी उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे.

उपनिबंधक, आर टी ओ कार्यालये सुरू झाली आहेत. असे लॉकडाऊन च्या चौथ्या टप्प्यात जनजीवन सुरळीत होण्यासह अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम केले जात आहे. पण काही व्यक्तींकडून अफवा पसरवून जनतेत संभ्रम निर्माण केला जात आहे.

यात सोशल मीडियात दुचाकी, चारचाकी वाहने पूर्ण बंद, दुकाने बंद, पुन्हा पहिल्या लॉकडाऊन प्रमाणेच बंधन येणार असून नागरिकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात असून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावांनी हे संदेश पसरवले जात आहेत. यामुळे या प्रकारची गंभीर दखल जिल्हाधिकारी यांनी अफवेला खतपाणी घालून नागरिकांत संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत.

त्यामुळे नागरिकांनी कुठलीही माहिती फॉरवर्ड करताना शहनिशा करून ती पुढे पाठवावी अन्यथा जर ही अफवा असली तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com