Thursday, April 25, 2024
Homeनाशिकघरी जाऊन दाढी करून देणे पडले महागात; संचारबंदी उल्लंघनाचे लासलगावी गुन्हे

घरी जाऊन दाढी करून देणे पडले महागात; संचारबंदी उल्लंघनाचे लासलगावी गुन्हे

लासलगाव | वार्ताहर
नाशिक जिल्ह्यात सध्या संचारबंदी सुरु आहे. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व सेवा पूर्णपणे बंद आहेत. यामुळे गेल्या महिन्याभरापासून नागरिकांना घरात बसून असल्याने दाढी कटिंग करता येत नाहीये. दरम्यान, ग्राहकाच्या घरी जाऊन दाढी कटिंग करणे लासलगाव येथील नाभिकाला चांगलेच भोवले आहे. संचारबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज प्रकाश पल्लाळ (रा गोविंदनगर लासलगाव ता निफाड) व अमोल चंद्रकांत पडील (रा लक्ष्मीनगर लासलगाव ता निफाड) अशी संशयितांची नावे आहेत. ब्राम्हणगाव विंचुर ता निफाड येथील गायकवाड मळा येथे दोघेही तोंडाला मास्क न लावता ग्राहकांची कटींग व दाढी करतांना आढळून आले.
याप्रकरणी लासलगाव पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 188 , 269 , 270 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तसेच सावकार पेठ लासलगाव ता निफाड येथे 6 जन अवैध रित्या जुगार खेळतांना मिळून आल्याने त्यांच्यावर गन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून 5 हजार 720 रू रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या