Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसम विषमचा फज्जा; गर्दी कायम राहिल्यास पुन्हा ‘लाॅकडाऊन’; जिल्हाधिकार्‍यांचा इशारा

सम विषमचा फज्जा; गर्दी कायम राहिल्यास पुन्हा ‘लाॅकडाऊन’; जिल्हाधिकार्‍यांचा इशारा

नाशिक । प्रतिनिधी

लाॅकडाऊन पाचमध्ये अटीशर्तीसह काहीअंशी सूट देण्यात अ‍ाली असून शहरात सम विषम फाॅर्म्युलासह बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या अाहेत. मात्र, सोशल डिस्टनचे उल्लंघन केले जात असून दिवाळीसारखी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी उसळली आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला ‌आहे. ते बघता जिल्हाधिकार्‍यांनी दिलेली सूट मागे घेऊन पुन्हा निर्बंध लावले जातील, असा इशारा दिला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘ ‘मिशन बिगिन अगेन’ अशी घोषणा करत महाराष्ट्र पूर्वपदावर आणण्यासाठी अटीशर्तिोंसह बाजारपेठा खुल्या करण्यास परवानगी दिली होति. त्यानूसार महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनि  शहरातील व्यापारी संघटना व पदाधिकार्‍यांची बैठक घेत दुकाने व बाजारपेठा सुरु करण्यासाठी नियमावली तयार केली.

सम विषम फाॅर्म्युलानूसार शहरातील दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे अर्थचक्र पुन्हा गतिमान करणे हा उद्देश होता. मात्र, शालिमार, भद्रकाली, सराफा बाजार, दूध बाजार, रविवार कारंजा या शहरातील मध्यवर्ती भागात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली.

दुकानदारांकडून देखील सम विषम फाॅर्म्युलाबाबत गोंधळ पहायला मिळाला. नागरिकांकडून सोशल डिस्टन्स नियमाची पायमल्ली झाली. या सर्व प्रकारामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

दोन दिवसांपुर्वी शहरात ६१ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. गर्दी नियंत्रणात आली नाही तर पुन्हा करोनाचा विस्फोट होऊ शकतो. ही भिती लक्षात घेता जिल्हाधिकारी मांढरे यांनी बाजारपेठा सुरु करण्याबाबत दिलेल्या सवलती मागे घेऊन पुन्हा निर्बंध लादले जातील असा इशारा दिला आहे.

बाजारपेठेत गर्दी होत असून दुकानदारांकडून सम विषमचा नियोजनानूसार अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. गर्दि कायम राहिल्यास करोना संसर्गाचा धोका  वाढु शकतो. नवीन फाॅर्म्युल्याबाबत पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे. महापालिका आयुक्तांशी चर्चा करणार आहे. गर्दी नियंत्रण न झाल्यास पुन्हा निर्बंध लादले जातील.

– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या