Monday, April 29, 2024
Homeनाशिकपत्रकार असल्याची बतावणी करुन ७० हजाराची लूट; नांदुरनाका परिसरातील घटना

पत्रकार असल्याची बतावणी करुन ७० हजाराची लूट; नांदुरनाका परिसरातील घटना

नाशिक | प्रतिनिधी

पत्रकार असल्य‍ाची बतावणी करून हॉटेलमधील कामगारांना मारहाण करत ७० हजाराची लूट केल्याची घटना शनिवारी (दि.११) रात्री नांदुरनाका परिसरात घडली.

- Advertisement -

याप्रकरणी राजन बहाद्दूर थापा राहणार सुगरण हाँटेल यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार थापा व त्यासह त्याचे तीन साथीदार असे येथील सुगरण हॉटेलचे कामगार आतमध्ये राहण्यास आहेत.

शनिवारी रात्री चार अनोळखी लोकांनी आपण पत्रकार आहोत अशी बतावणी केली. त्यांनी हॉटेलमध्ये घुसून चौघांना मारहाण थापाकडील ६० हजाराची रक्कम व सर्वांचे १० हजार ५० रुयांचे मोबाइल घेऊन पोबारा केला.या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खालकर करत अाहेत .

- Advertisment -

ताज्या बातम्या