नाशिकमध्ये पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न; चौक मंडईतील घटना

नाशिकमध्ये पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न; चौक मंडईतील घटना

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमधील आयफोनच्या शोरूममधून ८० ते ८५ मोबाईल फोन आणि महागडी घड्याळे चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच आज शहरातील भद्रकाली परिसरातील चौक मंडई येथे एटीएम फोडल्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलीस तपास सुरु आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अचानक वर्दळीच्या असलेल्या भद्रकाली परिसरात एटीएम फोडल्याच्या प्रकारामुळे चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांनाच आव्हान दिले आहे.

घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली असून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाची चक्रे फिरविण्यात आली आहेत.

Related Stories

No stories found.