नाशिककरांना दिलासा : प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरातील सर्व दुकाने उघडणार

नाशिककरांना दिलासा : प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरातील सर्व दुकाने उघडणार

नाशिक | प्रतिनिधी 

जिल्ह्यातील कंटेंटमेंट झोन वगळता रेड व आॅरेंज झोनमधील सर्व दुकाने, खासगी आस्थापना, उघडण्यास व व्यवसाय सुरु करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली आहे. मात्र, हाॅटेल, शाॅपिंग माॅल, सलून, जीम हे मात्र बंद ठेवले जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे मागील दिड महिन्यांपासून बंद असलेले बाजारपेठातील दुकानांचे शटर उघडणार असून अर्थचक्र गतिमान होणार आहे. दरम्यान, वरील ठिकाणी सोशल डिस्टन व सुरक्षेच्या नियमाचे पालन न केल्यास पुन्हा निर्बंध लादले जातील.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी (दि.५) पत्रकार परिषद घेऊन व्यावसायिक व दुकानदारांमध्ये असलेला संभ्रम दूर करुन दुकाने उघडण्यास परवानगी देत असल्याची माहिती दिली. लाॅकडाऊन तीनमध्ये कंटेंटमेंट झोन वगळता रेड व आॅरेंज झोनमध्ये शिथिलता देण्यात आली होती. त्यात एका लाईनीतील पाच दुकाने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती.

मात्र, नेमकी कोणती दुकाने सुरु करायची याबाबत प्रचंड गोंधळ होता. जीवनावश्यक वस्तुचीच दुकाने सुरु राहतील असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करुन शहरातील सर्व दुकाने सुरु करण्याचे आदेश देत यापुर्वी लावलेले निर्बंध मागे घेतले. त्यामुळे कपडा, सराफा, जीवनावश्यक निगडित सर्व दुकाने खुली होण्याचा मोकळा झाला आहे. तसेच खासगी आस्थापना देखील सुरु करता येणार आहे. त्यामुळे दैंनदीन व्यवहार सुरु होणार असून दुकानदार, व्यावसायिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे राहणार बंद

 • सलून , हाॅटेल, शाॅपिंग माॅल
 • चित्रपट व नाटयगृह
 • पान, तंबाखू, मद्य दुकाने
 • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
 • धार्मिक सोहळे, मेळावे, सभा
 • गर्दी होइल असे कार्यक्रमास मनाई

नियम बंधनकारक

 • सोशल डिस्टनन्स पाळणे
 • मास्कचा वापर
 • सॅनिटायझरचा उपयोग

कंटेंटमेंट झोनमध्ये निर्बंध कायम

 • नाशिक शहर – १०
 • मालेगाव – ६५
 • इतर जिल्हा – १०

शेती व उद्योगांना परवानगी दिल्याने अर्थचक्र गतिमान झाले आहे. आता कंटेंटमेंट झोन वगळता रेड व आॅरेंज झोनमधील सर्व दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अर्थ व्यवस्था पूर्वपदावर येईल. मात्र, सुरक्षा व सोशल डिस्टन्सचे पालन करणे बंधनकारक आहे.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

मद्य दुकानांबाबत लवकरच निर्णय

मद्य दुकानात झालेल्या गर्दिमुळे लाॅकडाऊनचा फज्जा उडाला होता. जिल्हाधिकार्‍यांनी मद्य दुकाने बंदीचे आदेश काढले होते. मात्र पालकमंत्री भुजबळ यांनी हमीपत्रावर लिहून घेउन मद्य दुकाने खुली करण्याची परवानगी देता येइल असे सांगितले. या बाबत जिल्हाधिकार्‍यांनी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना यासंदर्भात योजना पाठवणेस सांगितले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा संपूर्ण व्हिडीओ

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com