Video : अग्निशमन विभागाने दिले पक्षाला जीवदान
स्थानिक बातम्या

Video : अग्निशमन विभागाने दिले पक्षाला जीवदान

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या छतावरील एअर टर्बो व्हेंटिलेटर रींगमध्ये पक्षी अडकला होता. त्याला वाचविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी दिलीप क्षीरसागर यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला फोन करुन माहिती दिली.

अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी या ठिकाणी शिडी लावत पक्षाला जीवदान दिले. त्यानंतर सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.
एअर टर्बो व्हेंटिलेटर पक्षी अडकला होता.

आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी अरुण तांबे व इतर सहकार्‍यांनी पक्षाला तेथून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यास यश न मिळाल्याने अखेर अग्निशमन विभागाला सायंकाळी 5.30 वाजता फोन करुन माहिती देण्यात आली.

अग्निशमन विभागाने तत्परतेचे दर्शन घडवत या ठिकाणी वाहन धाडले. त्यातून शिडीच्याद्वारे एअर टर्बो व्हेंटिलेटर रींगमध्ये अडकलेल्या पक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.

अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले व अग्निशमनच्या कर्मचार्‍याने पक्षाला सुखरुप बाहेर काढत जीवदान दिले. अग्निशमनच्या के.टी.पाटील, उदय शिरके, राजेंद्र पवार, गणेश गायधनी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी भूतदयेचे दर्शन घडविले.

Deshdoot
www.deshdoot.com