Video : अवघ्या १७ व्या वर्षी अमेय वाघ ने केले होते डॉ. लागू यांच्या उपस्थितीत नटसम्राटचे शेवटचे सादरीकरण
स्थानिक बातम्या

Video : अवघ्या १७ व्या वर्षी अमेय वाघ ने केले होते डॉ. लागू यांच्या उपस्थितीत नटसम्राटचे शेवटचे सादरीकरण

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

डॉ. श्रीराम लागू यांनी नटसम्राट नाटकाचे शेवटचे सादरीकरण केले होते. तेव्हा, सध्याचा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता अमेय वाघ याने या नाटकात चोराची भूमिका केली होती.

काल डॉ. श्रीराम लागू यांचे निधन झाल्यानंतर अमेय वाघ याने हा व्हिडीओ शेअर करत आठवणींना उजाळा दिला. अमेय म्हणतो, नटसम्राटचे शेवटचे सादरीकरण मला जवळून अनुभवता आलं!

निर्माते आशिष जोग आणि नंदिनी जोग ह्यांच्यामुळे मला वयाच्या १७ व्या वर्षी ही संधी मिळाली होती. तालमी आणि शूटिंग दरम्यान ह्या नटसम्राटाच्या सानिध्यात राहून जे अनुभवलं ते अद्भूत होतं आणि जे शिकायला मिळालं ते माैल्यवान होतं!

डाॅ.लागू म्हणजे तपश्चर्या आणि विचारसरणी! ती कधीही संपणार नाही! विनम्र आदरांजली या शब्दांत अमेयने श्रद्धांजली अर्पण केली.

Deshdoot
www.deshdoot.com