Friday, April 26, 2024
Homeनाशिकधक्कादायक : अमेरिकेतून नाशकात परतलेली व्यक्ती करोना पॉझिटीव्ह; दिवसभरात १२ रुग्ण वाढले

धक्कादायक : अमेरिकेतून नाशकात परतलेली व्यक्ती करोना पॉझिटीव्ह; दिवसभरात १२ रुग्ण वाढले

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात दररोज करोना रुग्णांत वाढ होत असुन आज (दि.7) सायंकाळी नवीन 12 करोना बाधीतांची भर पडली आहे. यातील बहुतांशी रुग्ण जुन्या बाधीत रुग्णांच्या संपर्कातील असुन एक जण अमेरिकेहून परतल्यानंतर बाधीत असल्याचे समोर आले आहे. या वाढलेल्या रुग्णांमुळे नाशिक महापालिका क्षेत्रातील रुग्णांचा आकडा 378 पर्यत गेला आहे.

- Advertisement -

मुंबई नाका परिसरातील भाभा नगर परिसरातील २२ वर्षीय हा युवक ३१ मे २०२० रोजी अमेरिकेहून आलेला होता. त्यास एका हॉटेल मध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते. यादरम्यान या व्यक्तीचे स्वब घेण्यात आले होते त्याचा अहवाल आज आला असून तो अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

शहरात गेल्या सहा दिवसांपासुन करोना बाधीतांचा आकडा वाढत असुन 7 दिवसात 185 रुग्ण वाढले आहे. गेल्या 4 जुन रोजी 42, दि. 5 रोजी 21 व दि. 6 रोजी 27 अशाप्रकारे शहरातील करोना रुग्णांत पडत आहे. यामुळे रविवारपर्यत शहरातील रुग्णांचा आकडा 366 पर्यत आला होता.

आज यात सायंकाळी सहा वाजेपर्यत 12 ने भर पडुन तो 378 पर्यत पोहचला आहे. आज वाढलेल्या रुग्णांत 31 मे रोजी अमेरिकेवरुन परत आलेला आणि एका हॉटेलमध्ये कोरंटाईन करण्यात आलेले भागानगर मुंबईनाका भागातील उत्कर्षनगरचा रहिवाशी करोना पॉझिटीव्ह निघाला आहे.

तसेच इतर रुग्णांत फुले मार्केट कोकणीपुरा येथील 28 वर्षीय पुरुष, दुधबाजार त्र्यंबक दरवाजा येथील 27 वर्षीय युवती, खतीब बंगलो दारुसलाम कॉलनी येथील 27 वर्षीय युवक, याच कुटुंबातील 25 वर्षीय युवक, टाकळीरोड चक्रधर सोसायटीतील बाधीत रुग्णांच्या संपर्कातील 34 वर्षीय व्यक्ती, 6 वर्षाची मुलगी, 56 वर्षीय व 29 वर्षीय महिला, गोविंदनगर जयश्री निवास येथील 39 वर्षीय पुरुष, पंचकृष्ण बंगलो, काठे मळा टाकळीरोड येथील 30 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

मृत्युचा आकडा झाला 20…

शहरात शनिवारी करोना बाधीत असलेल्या चार जणांचा मृत्यु झाल्याने महापालिका हद्दीतील मृतांचा आकडा 18 इतका झाला आहे. गेल्या 1 जुन पासुन दररोज एक मृत्यु होत असतांना शनिवारी हा आकडा अचानक वाढला. त्यानंतर आज सातपूर अंबड लिंकरोड भागातल पाटील पार्क येतील 49 वर्षीय व्यक्तीचा आज सकाळी मृत्यु झाला. ही व्यक्ती सर्दी पडस्याचा त्रास होत असल्याने 26 मे रोजी उपचारासाठी दाखल झाली होती. तसेच बालाजी सदन नागचौक येथील 85 वर्षीय वृध्देचा आज मृत्यु झाला. अशाप्रकारे दोन मृत्यु झाले असुन आता मृताचा आकडा 20 झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या