नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने नाशिकमध्ये निदर्शने
स्थानिक बातम्या

नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने नाशिकमध्ये निदर्शने

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने नाशिकमध्य शिवसेना आक्रमक झाली आहे. पुस्तक प्रकाशनाच्या बॅनर ला जोडे मारत बॅनर जाळून कार्यकर्त्यानी निषेध केला.

बॅनर वर असलेल्या भाजपच्या नेत्यावर शाई फेक करत भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही यावेळी कार्यकर्त्यांनी केली.  आज के ‘छत्रपती नरेंद्र मोदी’ हे पुस्तक दिल्लीत प्रकाशित झाल्याने याचे सर्वत्र पडसाद उमटू लागले आहेत.

देशात ठिकठिकाणी आंदोलने व निदर्शने केली जात आहेत. या पुस्तकात नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आल्यामुळे सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे.

नाशिकमध्ये शिवभक्त तसेच विविध संघटना पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी बघायावास मिळाली असून सोशल मिडियादेखील या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करू लागला आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये आज झालेल्या निदर्शनांत हे पुस्तक महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात कुठेही विक्री होऊ देणार नसल्याचा पावित्रा आंदोलकांनी घेतला.

Deshdoot
www.deshdoot.com