सुट्टी संपवून परतत असताना शेणवड खुर्द आश्रम शाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

सुट्टी संपवून परतत असताना शेणवड खुर्द आश्रम शाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

वाडीवऱ्हे | वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील शेणवड खुर्द आश्रम शाळेतील विद्यार्थिनी सुट्टी संपुन शाळेत परतत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला गळफास घेऊन तिने आत्महत्या केल्याची घटना केल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, इगतपुरी तालुक्यातील मुरंबी व शेणवड खुर्द येथील आश्रम शाळेतील सविता गोपाळ शिंदे (वय १४) इयत्ता नववीत शिकणारी मुलगी मकरसंक्रांतीसाठी गावी सुट्टीवर आलेली होती. तिच्यासोबत तिची लहान बहिणदेखील होती.

सुट्टी संपवून त्या आज दुपारी (दि. २१) आई व चुलते यांच्यासोबत शाळेत परतत होती. शाळा दीड कि.मी.अंतरावर असतांनाच सविता हिने आईला पुढे जा व मी मागुन येते असे सांगत मागे थांबली. काही वेळाने ओढणीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेत तिने जीवन संपवले.

मुलगी आपल्या मागे राहिली, त्यामुळे आईने दुपारी दोनच्या सुमारास शोध घेण्यास सुरुवात केली.  शेणवड खुर्दचे सरपंच बापु वारघडे यांना एका मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समजली. यावेळी त्यांनी घटनास्थळी धाव घेत आश्रम शाळेतील शिक्षकांना याबाबतची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक एच.जी.आव्हाड व इतर शिक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

यानंतर पोलीस पाटील रमेश बांगर यांनी वाडीवऱ्हे पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव, गोपनीय विभागाचे सोमनाथ बोराडे, पोलीस हवालदार जी.एस.परदेशी, विनोद चौधरी, महिला पोलीस कॉन्स्टेबल मनीषा मथुरे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. वाडीवऱ्हे पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com