Friday, April 26, 2024
Homeनाशिककरोनाचा वाढता विळखा : खाजगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा आरक्षणाच्या हालचाली सुरू

करोनाचा वाढता विळखा : खाजगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा आरक्षणाच्या हालचाली सुरू

करोना रुग्णांसाठी शहरात 110 रुग्णालयातील 234 खाटा आरक्षित

नाशिक ।  प्रतिनिधी

राज्यातील करोना बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेऊन शासनाने राज्यातील खाजगी रुग्णालयातील 80 टक्के रुग्णशय्या आरक्षित करण्याचे आदेश काढले आहे. यानुसार आता नाशिक शहरातील वाढती रुग्ण लक्षात घेत नाशिक महापालिका प्रशासनाने शहरातील 30 किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णशय्या असलेल्या 110 रुग्णालयातील 234 खाटा आरक्षित केल्या आहे. तसेच खाटा आरक्षित करण्याचे काम सुरू असुन रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेकडुन आता सज्जता सुरू झाली आहे.

- Advertisement -

राज्यात करोना बाधीतांचा वाढता आकडा लक्षात घेत शासनाने काही दिवसापुर्वी सर्वच खाजगी रुग्णालये, सुश्रूत गृहे यांंच्याकडील 80 टक्के खाटा ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहे. यानुसार, मागील महिन्यात नाशिक महापालिका प्रशासनाने शहरातील 550 रुग्णालये व सुश्रूषा गृहांना पत्र पाठवून गरज पडेल तेव्हा 80 टक्के खाटा आरक्षित ठेवण्याची तयारी ठेवण्याच्या सुचना दिल्या होत्या.

यानंतर आता नाशिक शहरातील 30 खाटांचे किंवा त्यापेक्षा जास्त खाटा असलेल्या खाजगी रुग्णालयातील आरक्षित करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडुन सुरू करण्यात आले आहे. यात 30 किंवा 30 पेक्षा जास्त खाटा असलेल्या 110 खाजगी रुग्णालयांपैकी 64 रुग्णालयातील 234 खाटा आरक्षित करण्याचे काम आरोग्य व वैद्यकिय विभागाकडुन करण्यात आले आहे.

आरक्षित केलेल्या खाटात 27 आयसीयु बेड, 12 व्हेंटीलेटर बेड व 95 ऑक्सीजन लावता येणारे बेड अशा बेडचा समावेश आहे. अशाप्रकारे महापालिकेने करोना रुग्णांसाठी आता उपचारासाठी सज्जता ठेवली आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत शासनाच्या आदेशानंतर महापालिका आयुक्त राधाकऽष्ण गमे यांनी शहरातील डॉक्टरांच्या संघटना पदाधिकार्‍यांची बैठक घेतली होती.

यावेळी शासन आदेशाची माहिती देतांना पुढच्या काळात गरज पडल्यास 80 टक्के खाटा आरक्षित केले जाणार असुन त्यादृष्टीने तयारी ठेवण्याची सुचना आयुक्तांनी केली होती. शहरात महापालिकेकडे नोंद झालेली सुमारे 550 खाजगी रुग्णालये व सुश्रूषा गृहे आहे. यात महापालिकेकडुन 30 किंवा त्या पेक्षा जास्त खाटा असलेल्या खाजगी रुग्णालयातील खाटा आरक्षणाचे काम सुरू केले आहे.

यात 234 खाटा सध्या आरक्षित करण्यात आल्या असुन यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महापालिकेकडुन करोना बाधीत रुग्ण व अलगीकरण कक्ष यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात खाटा सज्ज ठेवण्यात आलेल्या असुन आता अद्यावत अशा खाटा आरक्षित खाजगी रुग्णालयात आता करोना रुग्णांवर उपचार करण्याची तयारी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या