नाशिक जिल्ह्यात ६६ नवे  करोनाबाधित आढळले; रुग्णसंख्या दीड हजाराच्या पार
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्ह्यात ६६ नवे करोनाबाधित आढळले; रुग्णसंख्या दीड हजाराच्या पार

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात करोना संसर्ग नियंत्रणात येत असताना नाशिक शहर व ग्रामिण भागात मात्र झपाट्याने रूग्ण वाढत आहेत.

नाशिक शहर आज अखेरचा अहवाल येईपर्यंत २७, ग्रामीण भागात १, चांदवडमध्ये  ५, येवलयात ३, निफाडमध्ये  १, मालेगाव १८  रुग्णांचा समावेश आहे. यात सोयगाव १, दाभाडी १, द्यानेत ९ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आज ६६ रूग्णांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. वाढ झालेल्या रूग्णांमध्ये एकट्या नाशिक शहरातील सर्वाधिक २७ तर ग्रामिण भागातील ३९ आहेत.

यामुळे जिल्ह्याचा करोनाग्रस्तांचा आकडा १५१७ इतका झाला आहे. ४ रूग्णांचा मृत्यू झला. तर ३३ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा  १००६ वर पोहचला आहे.

मालेगावपाठोपाठ नाशिक शहरात तसेच ग्रामिण भागात करोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. आज जिल्ह्याभरात नव्याने ६६ रूग्णांची भर पडली.

यामध्ये खासगी प्रयोग शाळेतून आलेल्या नाशिक शहरातील 7 अहवालांचा सामावेश आहे. यात पंपिंग स्टेशन रोड गंगापूररोड 1, ठाकरे बंगला 1, सरदार चौक 1, पंडीत कॉलनी 1, दारूसलाम कॉलनी 1, मडसांगवी, राजेंद्र कॉम्प्लेक्स, नाशिकरोड 1 येथील रूग्णांचा सामावेश आहे. तर जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार 20 पॉझिटिव्ह आहेत.

यात जुने नाशिक येथील नाईकवाडीपुरा 3, मोठा राजवाडा, वडाळा 3, नवीन नाशिकच्या पंडितनगर 2, जुने सिडको1, पेठरोड, पंचवटी2, सिन्नरफाटा 1, देवळाली कॅम्प 1, नाग चौक, पंचवटी 1, भवानीप्रसाद रो हाऊस 1, भवानीगर, टाकळीरोड 1, विधातेनगर, अशोकामार्ग 1, गुलमोहरनगर, म्हसरूळ1 येथील रूग्णांचा सामावेश आहे.यामुळे नाशिकशहराचा आकडा 365 वर पोहचला आहे.

ग्रामिण भागातील मालेगाव तालुक्यातील ध्याने 9, मनमाड 11, सोयगाव1, चांदवड1, निफाड शिरसगाव 1, मालेगाव3, दाभाडी 1, वडगाव आदिवासी वस्ती1 असे रूग्ण आहेत यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 249 झाला आहे. तर जिल्ह्यात आज 4 करोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात एकुण मृत्यू झालेल्यांचा आकडा 93 झाला आहे. तसेच जिल्ह्यात आज 33 रूग्ण करोना मुक्त झाले असून बरे होणारांचा आकडा 1006 वर पोहचला आहे.

दरम्यान जिल्ह्यात आजपर्यंत 13 हजार 247 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 11 हजार 547 निगेटिव्ह आले आहेत, 1489 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 390 रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 211 अहवाल प्रलबिंत आहेत. दरम्यान आज नव्याने 157 संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील 85, जिल्हा रूग्णालय 11, ग्रामिण 52, मालेगाव 6 संशयित रूग्णांचा सामावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com