Wednesday, May 15, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यात करोना रूग्णांंचा आकडा १६८३ वर आज नव्याने ४३ रूग्णांची...

नाशिक जिल्ह्यात करोना रूग्णांंचा आकडा १६८३ वर आज नव्याने ४३ रूग्णांची भर

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून नियंत्रणात असलेल्या मालेगावतही पुन्हा रूग्ण संख्या वाढली आहे. तर ग्रामिण भागातील नव्या भागात रूग्ण आढळत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात आज ४३ नव्या भर पडली यात एकट्या नाशिक शहरातील ३३ आहेत. तर ग्रामिण भागातील १० आढळले आहेत. यामुळे जिल्ह्याचा करोनाग्रस्तांचा आकडा १६८३ इतका झाला आहे.

नाशिक शहरात प्रामुख्याने प्रशासनास भिती असलेल्या जुने नाशिक, फुलेनगर झोपडपट्टी, वडाळा या परिसरात करोनाचा मोठ्या प्रमाणात शिरगाव झाल्याने मालेगाव प्रमाणे स्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नाशिकमधील करोनाग्रस्तांचा आकडा 487 जवळ पोहचला आहे.

आज जिल्ह्याभरात नव्याने ४३ रूग्णांची भर पडली. यामध्ये एकट्या नाशिक शहरात ३३ अहवाल बाधित आहेत. खासगी प्रयोग शाळेतून आलेल्या नाशिक शहरातील ९ अहवालांचा सामावेश आहे. भाभानगर १, कोकणीपूरा १, साई पार्क, पेठरोड ३, बागवानपुरा १, महात्मानगर १, दिंडोरीरोड १ यांचा सामावेश आहे.

तर रात्री जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालात १८ पॉझिटिव्ह आढळले. यात अमरधाम रोड १, नाईकवाडीपुरा १, आझाद चौक १, सरदारचौक २, नागचौक २, काठेमळा २, सातपूर कॉलनी २, पंचवटी १, फुलेनगर १, जयदीपनगर १, पेठरोड १ येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिकशहराचा आकडा ४८८ वर पोहचला आहे.

ग्रामिण भागातील पिंपळगाव बसंवत १ , येवला १, इगतपूरी १ असे रूग्ण आहेत यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा २८७ झाला आहे.
तर मालेगावाचा आकडा ८५४ वर स्थिर झाला आहे. करोनामुळे आज तीघांचा मत्यू झाला यामुळे मृत्यूचा आकडा १०२ झाला आहे. तसेच जिल्ह्यात आज ३३ रूग्ण करोना मुक्त झाले असून बरे होणारांचा आकडा १०९३ वर पोहचला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत १३  हजार ९८३ स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील १२ हजार ४७ निगेटिव्ह आले आहेत, १६७२ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ४५८ रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप २०२ अहवाल प्रलबिंत आहेत. दरम्यान आज नव्याने १८९ संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील १२०, जिल्हा रूग्णालय १४, ग्रामिण ४१, मालेगाव १४ संशयित रूग्णांचा सामावेश आहे.

१७० पोलीस करोनामुक्त

मालेगाव येथे कार्यरत जिल्हा ग्रामिण पोलीस दलातील पोलीसांना मोठ्या प्रमाणात करोनाची लागण झाली होती. हा आकडा १८९ पर्यंत गेला आहे. मात्र यातील १७० पोलीसांनी करोनावर मात केली आहे. यामध्ये ग्रामिण पोलीस दलाचे ८९, जालना १०, अमरावती ३९, औरंगाबाद १०, धुळे व अमरावती एसआरपीएफचे १३, मरोळ आणि धुळे प्रशिक्षण केंद्रातील २ , जळगाव पोलीस दलातील ४, मुंबई रेल्वेतील १२ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. तर ११ पोलीस अद्याप उपचार घेत असून तेही लवकरच करोनावर मात करून बाहेर पडतील असा विश्वास पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी व्क्त केला आहे

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित: १६८३
* मालेगाव : ८५४
* नाशिक : ४८७
* उर्वरित जिल्हा : २८७
* जिल्हा बाह्य ः ६५
* एकूण मृत्यू: १०२
* कोरोनमुक्त : १०९३

- Advertisment -

ताज्या बातम्या