Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यात करोना रूग्णांंचा आकडा १७२४ वर आज नव्याने ४१ रूग्णांची भर

नाशिक जिल्ह्यात करोना रूग्णांंचा आकडा १७२४ वर आज नव्याने ४१ रूग्णांची भर

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून ग्रामिण भागातील नव्या भागात रूग्ण आढळत आहेत. जिल्ह्यात आज 41 नव्या रूग्णांची भर पडली यात एकट्या नाशिक शहरातील 28 आहेत. तर ग्रामिण भागातील 12 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे जिल्ह्याचा करोनाग्रस्तांचा आकडा 1724 इतका झाला आहे.

- Advertisement -

आज जिल्ह्याभरात नव्याने 41 रूग्णांची भर पडली. यामध्ये एकट्या नाशिक शहरात 28 अहवाल आहेत. यामुळे नाशिकमधील करोनाग्रस्तांचा आकडा 512 जवळ पोहचला आहे.

खासगी प्रयोग शाळेतून आलेल्या नाशिक शहरातील 12 अहवालांचा सामावेश आहे. भाभानगर 2, अजमेरी चौक 2, बडी दरगा 1, भद्रकाली 1, जयभवानीरोड1, बजरंनगर, आनंदवली1, अंंबड सातपूर लिंकरोड1, सुभाषरोड 1, अशोकामार्ग 1 यांचा सामावेश आहे. ग्रामिण भागातील येवला, 1, सुरगाणा 1,मनमाड1, मडसांगवी 1, सिन्नर तालुक्यातील पाथरे 1, दोडी 1, जामगाव 1, इगतपुरी 1 असे रूग्ण आहेत यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 285 झाला आहे.

तसेच नाशिक शहरात करोनाचे नवीन 16 रुग्ण रात्रीच्या अहवालात बाधित आढळले. यामध्ये भाभा नगर 3, विडी कामगार 1, सुभाषरोड 1, काजी गल्ली शितलादेवी 2, सारडा सर्कल 1, महाराणा प्रताप नगर दिंडोरी रोड 1, फुले नगर 2, गुलमोहोर नगर 4, पेठरोड दत्त नगर 1,
शहरात दिवसभरात 28 रूग्णांना कोरोनाची लागण झाली.

तर मालेगावाचा आकडा 858 वर स्थिर झाला आहे. करोनामुळे आज तीघांचा मत्यू झाला यामुळे मृत्यूचा आकडा 105 झाला आहे. तसेच जिल्ह्यात आज 37 रूग्ण करोना मुक्त झाले असून बरे होणारांचा आकडा 1130 वर पोहचला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत 14 हजार 139 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 12 हजार 186 निगेटिव्ह आले आहेत, 1708 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 467 रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 251 अहवाल प्रलबिंत आहेत. दरम्यान आज नव्याने 183 संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील 103, जिल्हा रूग्णालय 12, ग्रामिण 30, मालेगाव 10 संशयित रूग्णांचा सामावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित: 1724
* मालेगाव : 858
* नाशिक :512
* उर्वरित जिल्हा : 285
* जिल्हा बाह्य ः 69
* एकूण मृत्यू: 102
* कोरोनमुक्त : 1093

- Advertisment -

ताज्या बातम्या