नाशिक जिल्ह्यात दिवसभरात २२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह; आरोग्यसेवक दगावला; जिल्ह्यात मृतांचे अर्धशतक

नाशिक जिल्ह्यात दिवसभरात २२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह; आरोग्यसेवक दगावला; जिल्ह्यात मृतांचे अर्धशतक

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरात आता करोनाने  थैमान घालण्यास सुरुवात केलेली दिसून येत आहे. आज दिवसभरात आठ रुग्ण एकट्या नाशिक शहरात वाढले. तसेच जिल्ह्यात दहा रुग्णांची आज भर पडली तर मालेगावमध्येही आज सायंकाळी आलेल्या अहवालात चार रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ९२४ वर पोहोचली आहे. तर एकट्या मालेगाव शहरातील रुग्णसंख्या ७०१ वर पोहोचली आहे. करोनामुले नाशिक शहरातील एक आणि मालेगावातील एक अशा दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

यामध्ये नाशिक येथील मृत्यू झालेला ५४ वर्षीय व्यक्ती त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली आरोग्य केंद्राचा सेवक होता. आजारपणामुळे ते गेल्या दहा दिवसांपासून समतानगर येथील त्यांच्या राहत्या घरी वास्तव्यास होते. तर मालेगाव शहरातील फरान रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णाचा आज मृत्यू झाल्याने शहरात करोना बळींची संख्या 47 वर पोहोचली आहे. तर नाशिक शहरातील मृतांची संख्या आता चारवर पोहोचली आहे.

नाशिक शहरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भद्रकालीतील नाईकवाडी पुरा येथील 4, वडाळा पाथर्डी रोडवरील शिवाजी वाडी येथील 1, टाकळीच्या समता नगर येथील 1, कॉलेजरोड येथील 54 वर्षीय पुरूष तसेच नवीन नाशिकच्या महाराणा प्रताप चौकातील 34 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

यामुळे नाशिक शहराचा आकडा 75 वर पोहचला आहे. तसेच करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात आज चार रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात मालेगाव, नाशिकसह नव्या विविध तालुक्यांतील नव्या गावात तसेच शहरातील विविध उपनगरांमध्ये करोनाचे नवे रूग्ण आढळून येत आहेत. आज आलेल्या ग्रामिण भागातील 11 अहवालात मनामाड येथील 2, सिन्नरच्या पांगरी येथील 2, कनकोरी 1, चांदवड 1, येवला 1, मौजे सुकेने 1, उगाव 2 असे अनेक नव्या ठिकाणचे रूग्ण आढळून आले आहेत. तर आज दिवसभरात 55 नवे संशयित दाखल झाले आहेत. यात मालेगाव मनपा हद्दीतील 9, ग्रामिण भागात 14 तर जिल्हा रूग्णालयात 25, ग्रामिण रूग्णायात 7 रूग्ण दाखल आहेत.

मालेगावी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये लिटल एंजल स्कूल, एमएसजी कॉलेज रोड सह इतर दोन ठिकाणच्या रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत 42 हजार 904 संशयित रूग्णांचे स्क्रीनींग करण्यात आले आहे. जिल्ह्यातून आजपर्यंत 9 हजार 547 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 8 हजार 388 निगेटिव्ह, 914 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 194 रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 245 अहवाल प्रलबिंत आहेत. तर आज नव्याने 55 संशयित रूग्ण दाखल झाले आहेत.

टाकळीतील एकाचा मृत्यू

नाशिकच्या टाकळी येथील एका 54 वर्षीय रूग्णाचा शासकीय जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान 22 मे ला सकाळी बारा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला होता. त्यांना मधुमेह तसेच हृदय विकाराचा त्रास होता. अत्यंत चिंताजनक स्थितीत त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्ॅॅवब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ते आत प्राप्त झाले असून पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान जिल्हा रूग्णालयात 45 रूग्ण उपचार घेत असून यामध्ये 18 बाधीत तर 27 संशयित आहेत. त्यांची पकृती स्थिर असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निलेश जेजुरकर यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित: ९२४
* मालेगाव : ७०१
* नाशिक : ७५
* उर्वरित जिल्हा : १२१
* जिल्हा बाह्य ः ३९
* एकूण मृत्यू: ५१
* कोरोनमुक्त : ६७३

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com