Video : मुक्तिधाम प्रांगणात साकारल्या २१ वैविध्यपूर्ण रांगोळ्या; वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
स्थानिक बातम्या

Video : मुक्तिधाम प्रांगणात साकारल्या २१ वैविध्यपूर्ण रांगोळ्या; वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिकरोड | संजय लोळगे

येथील मुक्तिधाम प्रांगणातराजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशातील विविध प्रांतातील संस्कृती दर्शविणाऱ्या २१ रांगोळ्या पूजा अष्टेकर यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आल्या. या रांगोळ्यांची लंडन येथील वंडर बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेत पूजा अष्टेकर यांसह ४२ सहभागी महिलांना वंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या पश्चिम भारताच्या मुख्य समनव्यक अॅमी छेडा यांनी प्रमाणपत्र प्रदान केले आहे.

महाराष्ट्रातील चैत्रांगण,संस्कार भारती,पैठणीसह ठिपक्यांची रांगोळी,आदिवासी विभागाची वारली रांगोळी, उत्तराखंडची आयपला, आंध्रप्रदेशची पडीमुग्गूलू, उत्तर प्रदेशची चौकपूरा, बिहारची अरीपन, बंगालची अल्पना, तामिळनाडूची पडीकोलम, कर्नाटक फुलांची रांगोळी, उडीसाचे झोटीचित्रा, बिहारची मधुबनी, राजस्थानची मांडना, गुजरातची लिंपण, मध्यप्रदेशची चौकपुराणा,तिबेटची मंडला अशा भारताचे सांस्कृतिक वैभव दर्शविणाऱ्या २१ रांगोळ्या मुक्तिधामच्या प्रांगणात साकार करण्यात आल्या.

खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते पूजन करून या रांगोळ्या सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या. नाशिकरोड परिसरातील रांगोळी प्रमुख पूजा अष्टेकर ४२ महिला या विश्‍वविक्रमी रांगोळ्या साकारल्या.सकाळी सात वाजल्यापासून या रांगोळीची संकल्पना मांडणाऱ्या पूजा अष्टेकर यांसह नलिनी कड,सारिका मंचेकर, शीतल अष्टेकर, मंदा मुदलियार, योगिता बारापात्रे, सीमा कासलीवाल, राजनंदिनी अहिरे, प्रणिता पाडोस्कर, सिल्केशा अहिरे, नीलांबरी पाटील, मनीषा पटवर्धन,चंदा लांडे, मृणाल हजारे, लावण्या अय्यर, प्रीती पारवे, शर्वरी देशपांडे, यशांजली कुलकर्णी, जान्हवी रास्ते, मैथिली दीक्षित, सुरेखा पेखळे, शुभांगी उगले, संगीता ताजनपुरे, श्रावणी घोडके, शीतल काळे, अंजली गायधनी, राजश्री साखरे, माधवी नाईक, सायली हिरे, मंजुषा तातोडे, अनिता यादव, अर्चना सूर्यवंशी, प्रतीक्षा वराडे, इंद्रायणी सांगळे, हेमलता चव्हाण, प्रतीक्षा अहिरे आदींनी या रांगोळ्या रेखाटल्या.

दरम्यान काल रविवार असल्याने मुक्तिधाम येथे येणारे पर्यटक या रांगोळ्या पाहण्यासाठी गर्दी करत रांगोळ्यांसह सेल्फी व फोटो घेत होते.सांयकाळी आयोजित कार्यक्रमात निर्भया पथकाच्या वैशाली मुकणे यांनी महिला सुरक्षा या विषयवार मार्गदर्शन केले. यावेळी मुक्तिधाम चॅरिटेबल ट्रस्टचे जगदीश चव्हाण यांनी प्रांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रिया जैन व आभार अभिजित अष्टेकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी विनय जगताप,पियुष ऐनडाई यांसह सदस्य प्रयत्नशील होते.

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदाची रांगोळी ठरली आकर्षण

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत सिडको परिसरातील रांगोळीकार अविनाश बावणेंनी तब्बल ३ तास सलग मेहनत घेत राजमाता जिजाऊ यांची मुक्त हस्ताने साकारलेली रांगोळी तर २ तासात स्वामी विवेकानंद यांचे रेखाटलेली रांगोळी या कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. या रांगोळीसाठी २५ किलो विविधरंगी रांगोळ्यांचा वापर करून सहा तासात काढण्यात आली.

Deshdoot
www.deshdoot.com