नाशिक : दोनशेपेक्षा अधिक रिकामटेकड्यांवर कारवाई; ६६ हजार दंड वसूल
स्थानिक बातम्या

नाशिक : दोनशेपेक्षा अधिक रिकामटेकड्यांवर कारवाई; ६६ हजार दंड वसूल

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

file photo

नाशिक  | कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊन व संचार बंदी करण्यात आलेले असतानाही विनाकारण भटकणाऱ्या २०२ वाहनाचलकांवर बुधवारी ( ता. ९) शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. त्यांच्याकडून ६५ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी परवानगी घेवून बाहेर पडावे अन्यथा घरीच थांबावे, सोशल डिस्टनस ठेवावा, असे आवाहन पोलीस करत आहेत.

तरीही, काहीजण आदेशाचे उल्लंघन करत आहेत.अशावंर पोलिसांनी कडक कारवाई सुरु केली आहे. बुधवारी शहरातील विविध भागात विनाकारण भटकंती करणाऱ्या २०२ वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली.

त्यांच्याकडून ६५ हजार ७०० रुपये दंड वसूल केला. वाहनचालकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर जाताना वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com