Monday, April 29, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यात नवे १९ रुग्ण पॉझिटिव्ह; मनमाडमध्ये पोलिसाच्या आईला करोना; जिल्ह्यातील रुग्णसंख्या...

नाशिक जिल्ह्यात नवे १९ रुग्ण पॉझिटिव्ह; मनमाडमध्ये पोलिसाच्या आईला करोना; जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३१७ वर

मालेगावात ७ तर जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरातील १२ रुग्ण बाधित;  करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा जिल्ह्यात तीनशे पार

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा तीनशेच्या पार गेला आहे. आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यात १९ रुग्ण वाढल्यामुळे करोना बाधित रुग्णांची जिल्ह्यातील संख्या आता ३१७ वर जाऊन पोहोचली आहे. तर एकट्या मालेगावात करोना बाधितांची संख्या २८१ वर पोहोचली आहे.  नाशिक शहरात ७ तर ग्रामीणमध्ये ५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये मनमाड, चांदवड तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात नाशिक जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरचाही समावेश असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे मनमाडमध्ये पोलिसाच्या आईला करोना झाल्याने संपूर्ण परिसर सील केला जात आहे. नाशिक शहरातील देवळाली कॅम्प येथील एका २९ वर्षीय आर्मीच्या जवानाला करोनाने ग्रासले असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाथर्डी फाटा येथील मालपाणी सफ्रोन येथील एका ४० वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे.

सातपूर कॉलनीतील एका ६० वर्षीय महिलेला करोनाची बाधा झाली आहे. पंचवटी परिसरातील एका ५४ वर्षीय व्यक्तीलाही करोनाची लागण झाल्याचे समजते आहे. सिडको आणि उत्तमनगर येथीलदेखील ३९ आणि ४२ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे.

येवला तालुक्यातील एका ३६ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली. दुसरीकडे धुळे येथील पण सध्या नाशकात वास्तव्यास असेलेल्या एका ६७ वर्षीय वृद्धाला करोना झाल्याचे समजते आहे.

सिन्नर तालुक्यातही एका ८६ वर्षीय वृद्धेला करोनाची लागण झाल्याचे समजते आहे. चांदवड तालुक्यातील असलेला रुग्ण देवरगाव येथील असल्याचे समजते.

नाशिक जिल्हा रुग्णालयातील एका ५४ वर्षीय डॉक्टरला करोनाची बाधा झाल्याचे समजते आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण आहे.

मनमाडमध्ये पोलिसाच्या आईला करोना

तिकडे मनमाड मनमाडमध्ये करोनाचा शिरकाव झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सदर महिला ही पोलिसाची आई असल्याचे समजते. काही दिवसापूर्वी हा पोलीस तीला भेटण्यासाठी मालेगाव येथून आला होता. या पोलिसाचा अहवालदेखील बाधित आलेला आहे. महिला ज्या भागात राहते तो आनंदवाडी परिसर पूर्णपणे सील करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या