Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकहून विशेष रेल्वेने १५९८ परप्रांतीय लखनऊकडे रवाना

नाशिकहून विशेष रेल्वेने १५९८ परप्रांतीय लखनऊकडे रवाना

नाशिकरोड । नाशिकरोड रेल्वे स्थानकामधून शुक्रवारी(दि.१५) रात्री सव्वा आठच्या सुमारास उत्तर प्रदेशातील लखनऊकडे १५९८ परप्रांतीय मजुरांना घेऊन विशेष रेल्वे रवाना झाली. यावेळी नाशिक जिल्हा प्रशासनाकडून गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. आज पाठविण्यात आलेल्या परप्रांतीय मजुरांमध्ये सिन्नर तालुक्यातील १५६१ तर पेठ तालुक्यातील ३७ मजुरांचा समावेश आहे.

लाॅकडाऊनमुळे नाशिक शहरात अडकलेल्या परप्रांतीयांना उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात सोडविण्यासाठी चार रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून आज या प्रवाशांची तिकिटे काढण्यात आली. जवळपास ८ लाख ८३ हजार ३४० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जमा केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली.

- Advertisement -

यावेळी सिन्नर तसेच पेठ तालुक्यातील प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. सिन्नरहून या मजुरांना बसने आणण्यात आले होते. याठिकाणी कुन्हीही विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते.  त्यानुसार ही प्रक्रिया शांततेत पार पडली.

आज रवाना झालेल्या विशेष रेल्वेत  ७५ मुले ५ वर्षाच्या आतील असल्याने त्यांना कोणतेही तिकीट आकारण्यात आले नसल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. याआधी पहिली रेल्वे भोपाळ (म.प्र), दुसरी लखनऊ, तिसरी रेवा(म.प्र) व चौथी रेल्वे आज लखनऊ (उ.प्र) कडे रवाना झाली.

आज सकाळी एक विशेष रेल्वे मुंबईहून दुपारी नाशिककडे आली होती. यावेळी चालक अदलाबदलीदरम्यान ही रेल्वे स्थानकात काही काळ थांबली होती. याच वेळी गाडीतील प्रवाशी खाली उतरलेले बघायला मिळाले होते. दरम्यान, गाडीने स्थानक सोडताच याठिकाणी रेल्वे स्थानकाकडून संपूर्ण स्थानक निर्जंतुक करण्यात आले. या सर्व काळात रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पुरती दमछाक आज झालेली बघायला मिळाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या