नाशिक जिल्ह्यात करोना रूग्णांचा आकडा १ हजार १६३ वर; नव्याने ५५ रूग्णांची भर, शहरात २६ पॉझिटिव्ह
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्ह्यात करोना रूग्णांचा आकडा १ हजार १६३ वर; नव्याने ५५ रूग्णांची भर, शहरात २६ पॉझिटिव्ह

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

मालेगावपाठोपाठ नाशिक शहरात करोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. आज जिल्ह्याभरात नव्याने 55 रूग्णांची भर पडली. यात एकट्या नाशिक शहरातील 26 व मालेगाव येथील 17 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत करोना ग्रस्तांची संख्या 1163 वर पोहचली आहे. तर आज एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 65 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत.यात नाशिक शहरातील वडाळा 7, दिपालइनगर 4, नवीन नाशिक येथील साईबाबानगर, उत्तमनगर 1, लेखानगर1, जुने नाशिक, कमोद गल्ली 2, नाईकवाडी चौक 3, कथडा 1, पेठरोड 1, अंबडलिंकरोड, गणेशवाडी क्रांतीनगर 1, रामवाडी 1, निमाणी 1, सिन्नरफाटा 1 तर आडगाव ग्रामिण पोलीस मुख्यालयातील 2 पोलीसांचा यात सामावेश आहे यामुळे नाशिकशहराचा आकडा 179 वर पोहचला आहे.

ग्रामिण भागातील आज केवळ 10 रूग्ण आढळून आले आहेत. ते सिन्नर 5, नांदगाव 4, येवला 1येथील आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 166 झाला आहे. तर मालेगाव शहरातील आज 17 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गुरूवारी एकाच दिवशी 32 रूग्ण येथे पॉझिटिव्ह आल्याने शांत झालेल्या मालेगावमध्ये पुन्हा उद्रेक झाल्याची चर्चा होती. मात्र दुसर्‍या दिवशी 17 रूग्ण आढळल्याने काहीसा दिलासा प्रशासनास मिळाला आहे.

यामुळे मालेगाव येथील रूग्णांचा आकडा 765 वर पोहचला आहेे. जिल्ह्यात आज एकाचा मृत्यू झाला असल्याने एकुण मृत्यू झालेल्यांचा आकडा 61 आहे. तसेच जिल्ह्यात करोना मुक्त होणारांचा आकडा 786 वर पोहचला आहे.

दरम्यान जिल्ह्यात आजपर्यंत 11 हजार 218 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 9 हजार 491 निगेटिव्ह आले आहेत, 1130 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 277 रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 603 अहवाल प्रलबिंत आहेत. अहवाल प्रलंबित राहण्याच्या प्रमाण वाढले असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

यामुळे मागील काही दिवसांचे अहवाल एकत्र आल्यानंतर एकदम करोनाग्रस्तांचा आकडा वढलेला दिसतो असे रूग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान आज नव्याने 211 संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील 77, जिल्हा रूग्णालय 12, ग्रामिण 73, मालेगाव 39 संशयित रूग्णांचा सामावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

एकूण कोरोना बाधित: 1163
मालेगाव : 765
नाशिक : 179
उर्वरित जिल्हा : 166
जिल्हा बाह्य ः 54

एकूण मृत्यू: 61
कोरोनमुक्त : 786

Deshdoot
www.deshdoot.com