Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक @१४.२ अंश सेल्सियस; हुडहुडीचे संकेत

नाशिक @१४.२ अंश सेल्सियस; हुडहुडीचे संकेत

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिककरांना यंदाची थंडी हुडहुडी भरविणार असे संकेत गेल्या अनेक दिवसांपासून मिळू लागले आहेत. काल(दि.०६)  नाशिकचे किमान तापमानाबरोबरच आज सकाळी कमाल तापमानाचा पारही खाली आल्याने गारठा निर्माण झाला आहे. येणाऱ्या काही दिवसांत नाशिकमधील थंडी अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांनी दरवर्षी येथील गुलाबी थंडीचीही भुरळ पडत असते. वातावरण आल्हाददायक असल्याने हिवाळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी वाढलेली असते.

नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये तर अगदी चार अंशांच्या खालीदेखील तापमान आलेले असते.  यंदाही बोचरी थंडी नाशिककरांना अनुभवास येऊ लागली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

वातावरणात हवा असल्यामुळे आजारपणात वाढदेखील झालेली बघायला मिळाली आहे.  गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील किमान तापमान १७ ते २० अंशांपर्यंत होते.

आज अचानक तापमानाचा पारा चार अंशांनी घसरला. आज मिळालेल्या माहितीनुसार तापमानाचा पारा १४.०२ अंशांवर स्थिर झाला.  किमान तापमान घसरत असतानाच आता कमाल तापमानातही काहीशी घसरण झालेली बघायला मिळत आहे.

दिनांक                  किमान तापमान 

०७ डिसेंबर २०१९     १४.२ अंश सेल्सियस

०६ डिसेंबर २०१९     १८.६ अंश सेल्सियस

०५ डिसेंबर २०१९     २०.० अंश सेल्सियस

०४ डिसेंबर २०१९     १८.० अंश सेल्सियस

०३ डिसेंबर २०१९     १८.० अंश सेल्सियस

०४ डिसेंबर २०१९     १७.६ अंश सेल्सियस

- Advertisment -

ताज्या बातम्या