शुक्रवारपासून मद्याची दुकाने सुरु होणार; व्हाॅटस्अपद्वारे मिळणार मद्य खरेदीचे टोकन

शुक्रवारपासून मद्याची दुकाने सुरु होणार; व्हाॅटस्अपद्वारे मिळणार मद्य खरेदीचे टोकन

नाशिक । प्रतिनिधी

मालेगाव महापालिका व नाशिक शहर व जिल्ह्यातील कंटेंटमेंट झोन वगळून रेड व आॅरेंज झोनमध्ये मद्य दुकाने गुरुवारपासून (दि.७) पुन्हा सुरु करण्याची परवानगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली असून याबाबत आदेश जारी केले आहेत. दुकानदारांना घालून दिलेल्या अटी शर्तीची पूर्तता करण्यासाठी एक दिवसाचा वेळ देण्यात आला असून मद्याची दुकाने येत्या शुक्रवार (दि.०८) सकाळी दहा वाजेपासून सुरु होणार आहेत.

दुकानदारांना सोशल डिस्टनचे पालन करणे बंधनकारक असून गर्दी होणार नाही असे हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे. अटिशर्तींचे उल्लंघन झाल्यास मद्य दुकानाचा परवाना रद्द केला जाणार आहे.

दोन दिवसांपुर्वी मद्य खरेदीसाठी तळिरांमाची झुंबड उडाली होती. सोशल डिस्टनचा फज्जा उडाल्याने जिल्हाधिकार्‍यांनी मद्य विक्रिवर बंदी घातली होती. तसेच मद्य विक्रेत्यांवर गुन्हे देखील दाखल केले होते.

उत्पादन शुल्ककडून मद्य दुकाने सुरु करण्याबाबत नवीन आराखडा मागवला होता. त्यानूसार, गुरुवारपासून नवीन अटिशर्तिसह मद्य दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, जिल्ह्यातील कंटेंटमेंट झोनमध्ये मद्य विक्रिला बंदी असेल. दुकानांसमोर गर्दी होणार नाही असे हमीपत्र मद्य विक्रि दुकानदारांना दयावे लागणार आहे. व्हाटस्अपद्वारे मद्य खरेदीचे टोकन मद्य विक्रेत्यांना त्यांच्या दुकानाबाहेर मोबाइल नंबर फलकावर लावावे लागेल.

कुपन आणि इतर माहितीची वेळोवेळी लाॅउड स्पिकरद्वारे करावी लागेल. मोबाइल नंबरवर ग्राहकांना मद्य खरेदीची वेळ घ्यावी लागेल. दुकानदारांकडून मद्य खरेदीचा स्टाॅक, वेळ व तारिख ग्राहकाला पाठवली जाईल. एका तासात ५० विदेशी व ५० देशी मद्य खरेदी करणार्‍या ग्राहकांना देता येईल असे नियोजन करण्यात आले आहे.

हे नियम बंधनकारक

 • दुपारी चार वाजेपर्यंत मद्यची दुकाने सुरु ठेवता येईल
 • दुकांनापुढे पाच पेक्षा जादा ग्राहक नसावे
 • दोन ग्राहकांमध्ये सहा फुटाचे अंतर असावे
 • दुकानांसमोर सहा फूट अंतरावर वर्तुळ आखावे
 • दर दोन तासांनी दुकान परिसर निर्जतुकिकरण करावा
 • दुकानातील नोकर व येणारे ग्राहक यांचे थर्मल स्कॅनिंग करावे
 • सर्दी खोकला ही लक्षणे दिसल्यास रांगेत प्रवेश देउ नये
 • मद्य विक्रेत्यांनी हॅण्डग्लोज घालावे. सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे. मास्कचा वापर बंधनकारक
 • दुकानात मद्य प्राशान करता येणार नाही
 • परिसरात थुंकण्यास मनाई
 • सकाळी दहा ते दुपारी चार ही वेळ मद्यविक्रिसाठी असेल

शुक्रवारपासून मद्य मिळणार

एकूणच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जिल्ह्यातील एक असलेली मद्यविक्रीची दुकाने सुरु होणार आहेत. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर नियम आणि अटी अति क्लिष्ट स्वरुपात घालून दिल्या आहेत. दुकानाच्या बाहेर सर्कल केली जाणार आहेत. गर्दीचे नियोजन, ऑनलाईन टोकन दिले जाणार असल्यामुळे अनेक दुकानदारांमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहेत. जिल्हा प्रशासनाकडून घालून देण्यात आलेले नियम पाळण्यासाठी दुकानदारांचा पहिला दिवस यामध्ये खर्च होण्याची शक्यता आहेत. त्यामुळे मद्यविक्रीला उद्यापासून परवानगी जरी असली तरी अनेक भागांत पूर्वतयारीला काहीसा जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे मद्यविक्री गुरुवार ऐवजी शुक्रवारपासून सुरळीत होण्याची चिन्हे आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com