सह्हायक प्राध्यापक पदासाठीची सेट परीक्षा 28 जूनला होणार
स्थानिक बातम्या

सह्हायक प्राध्यापक पदासाठीची सेट परीक्षा 28 जूनला होणार

Gokul Pawar

नाशिक । महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सहायक प्राध्यापक होण्यासाठी घेण्यात येणारी राज्यसतरीय पात्रता अर्थात ‘सेट’ परीक्षा आता सुधारीत वेळापत्रकानुसार 28 जून 2020 रोजी होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) नेट परीक्षा 20 जून रोजी संपणार आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 21 जून रोजी होणार होती.

त्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये किंवा विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहू नये, यासाठी ही परीक्षा आता 28 जून रोजी घेण्यात येईल. ‘सेट’ परीक्षेची प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबवली जाते आहे. याबाबत सविस्तर माहिती http://setexam.unipune.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाकडून ही 36 वी परीक्षा असून ती मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पणजी(गोवा) या केंद्रांवर घेतली जाईल.

विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच विद्यापीठाच्या http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर 1 ते 21 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करावे. खुल्या गटासाठी 800 रुपये शुल्क असून इतर मागासवर्गीय गटासाठी 650 रुपये शुल्क आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव तथा सेट सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com