यंदाच्या ‘सुलाफेस्ट’ला सलीम-सुलेमान लावणार चार चांद’; जितकी गर्दी तितकी झाडे लावणार
स्थानिक बातम्या

यंदाच्या ‘सुलाफेस्ट’ला सलीम-सुलेमान लावणार चार चांद’; जितकी गर्दी तितकी झाडे लावणार

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । सुला विनियार्ड्सकडून संगीत प्रेमींसाठी पुन्हा एकदा जागतिक स्तरावरील संगीत महोत्सव अर्थात तेराव्या हंगामातील ‘सुलाफेस्ट’ 2020 येत्या 1 आणि 2 फेब्रुवारी आयोजित करण्यात आला आहे. सुला विनियार्ड्सच्या यशस्वी वाटचालीचे हे विसावे वर्षे आहे.

गंगापूर धरणाच्या परिसरात असलेल्या सुला विनियार्ड्सच्या प्रांगणात सुलाफेस्टच्या तयारीला वेग आला असून, यंदाचा महोत्सवदेखील संगीत प्रेमींसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. या दोन दिवसीय संगीत महोत्सवात ब्रिटिश चार्ट टॉपर ‘हॉट चिप’ भारतातील पाहिले सादरीकरण सुलाफेस्टच्या व्यासपीठावर करणार आहेत. तर ‘सलीम-सुलेमान’ ही भारतातील लोकप्रिय जोडी या महोत्सवात बॉलिवूड तडका लावणार आहेत.

अत्यंत आकर्षक लाईनअप मध्ये प्रसिद्ध डच-न्यूझीलंड ट्रायो, ‘माय बेबी’ (ज्यूट वेन डिजडिजिकक, कॅटो वन डिजिक आणि डॅनियल द फ्रीझ, जॉनस्तोन) यांच्या तर्फे त्यांच्या अनोख्या शैलीतील सादरीकरण होणार आहे. ‘द लोकल ट्रेन’(रामित मेहरा, रमण नेगी, साहिल सरीन आणि पराग ठाकूर) यांच्याकडून हिंदी गाण्याची जुगलबंदी ऐकायला मिळणार आहे. सुलाफेस्ट येथे धमाकेदार संगीतासोबत वाईनविषयी जाणून घेण्याची संधी उपलब्ध असणार आहे. हे सर्व करत असताना आलेला थकवा घालवत काही क्षण ‘विनो स्पा’ येथे घालवण्याची संधी असणार आहे.

गर्दीच्या संख्येइतकी झाडे लावणार
सुलाफेस्ट निमित्त प्रत्येक तिकीट विक्री इतके झाडे अर्थात रोपट्यांची लागवड सुला विनियार्ड्स तर्फे केली जाणार आहे. या माध्यमातून देशातील सर्वात शाश्वत संगीत महोत्सव म्हणून नावलौकिक मिळविण्याचा उद्देश आहे.

सुला विनियार्ड्स
वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणुन नाशिकची ओळख निर्माण करण्यात सुलाचे योगदान आहे. जागतिक दर्जाच्या उभारणीमुळे हे ठिकाण जगभरातील पर्यटकांसाठी सुट्यांच्या काळात पसंतीचे ठिकाण बनले आहे. सुला विनियार्ड्स हे जागतिक स्तरावर सर्वाधिक पर्यटक भेट देणार्‍या वाईनरी पैकी एक असून, दरवर्षी येथे 4 लाखहून अधिक लोक येत असतात. सुलाची वाईन 30 हून अधिक देशांमध्ये निर्यातदेखील केली जात आहे. जुलै 2018 मध्ये 10 लाख (1मिलियन) वाईन केस विक्री करणारी भारतातील पहिली कंपनी होण्याचा विक्रम नोंदविला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com