२२ व २३ डिसेंबरला राज्यात पावसाचा अंदाज; नाशिक १३ अशांवर
स्थानिक बातम्या

२२ व २३ डिसेंबरला राज्यात पावसाचा अंदाज; नाशिक १३ अशांवर

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : थंडीचा जोर वाढत असून मुंबईसह, ठाणे, पालघर भागामध्ये येत्या रविवारी (दि. २२) तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २३ डिसेंबर पर्यत ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान हवामान बदलांमुळे तुरळक सरी बरसणार असल्याचे स्कायमेट या खाजगी वेधशाळेने सांगितले आहे. त्यामुळे येत्या २२ व २३ डिसेंबर रोजी मुंबईसह नजीकच्या शहरांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

२०१९ या वर्षात पाऊसाने जोरदार धुमाकूळ घातल्याने अनेक ठिकणी पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर दिवसेंदिवस हवामान बदलत आहे. नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा घसरला असून तापमानाचा पारा १३ अशांवर स्थिरावला आहे. दरम्यान अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या वेधशाळेने म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com