Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनव वधू-वरांना ‘प्री-वेडिंग’ची भुरळ

नव वधू-वरांना ‘प्री-वेडिंग’ची भुरळ

नाशिक । गोकुळ पवार

लग्न म्हटले की, गोड आठवणींचा सोहळाच असतो. हाच सोहळा आठवणीच्या स्वरुपात जपण्यासाठी कॅमेर्‍यात कैद केला जातो. परंतु हल्लीच्या जमाना फास्ट झाल्याने लग्नापूर्वीच्या आठवणीदेखील कॅमेर्‍यात बंदिस्त करण्यासाठी नवा पर्याय निवडला जात आहे. तो म्हणजे प्री-वेडिंग शूट होय.

- Advertisement -

सध्या विवाह सोहळा एका विधीपुरता मर्यादित न राहता, लग्नाच्या आधीच्या क्षणांचा आनंद साठवून ठेवण्याकडे तरुणाईचा कल दिसून येत आहे. भावी वधू-वराच्या पहिल्या भेटीपासून ते एकमेकांच्या विवाह सोहळ्यापर्यंतचे सर्व क्षण पुन्हा अनुभवून साठवण्यासाठी ङ्गप्री-वेडिंगफ शूट केले जात आहे. म्हणजेच लग्न ठरल्यावर दोघे पहिल्यांदा कधी भेटले, कुठे भेटले, लग्नासाठी कुणी पहिल्यांदा विचारले? यासारख्या आठवणी कॅमेर्‍यात साठवल्या जात आहेत. त्यामुळे पहिल्या भेटीपासून ते लग्न ठरण्यापर्यंतचा प्रवास कॅमेर्‍यामध्ये बंदिस्त करण्याचा पर्याय तरुणाईने निवडला आहे. यासाठी प्री-वेडिंग शूट करणार्‍या फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्सना मोठी मागणी वाढली आहे. काही जण याच फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्सना लग्नासाठीही निश्चित करतात.

पूर्वीच्या काळी लग्न होईपर्यंत नव्हे लग्नानंतरही कित्येक दिवस नवरा-नवरी बोलायची नाहीत. परंतु आताची तरुणाई यापुढे जात आयुष्यातील महत्त्वाच्या सोहळ्याला कॅमेर्‍यात बंदिस्त करताना दिसत आहे.
गेल्या काही वर्षात प्री-वेडिंग शूटला फार मागणी आली आहे. यामध्ये जोडपे एखाद्या संकल्पनेवर आधारित फोटोशूट किंवा व्हिडिओशूट करीत असते. यामध्ये काहीवेळा साधारण कांद्यापोह्याच्या कार्यक्रमापासून ते लग्नापर्यंतची कहाणी यामध्ये छोट्याशा फिल्ममार्फत चित्रित केली जाते. यासाठी हटके लोकेशनवर हे शूट केले जाते. फोटोग्राफर्सच या जोडप्यांना शूटसाठी ठिकाणे सुचवत असतात.

प्री-वेडिंग काय असतं?
या शूटवेळी फोटो फ्रेम्स, फुगे, छत्री, बाईक, सायकल, गाडी तसेच लग्नाची तारीख लिहिलेल्या पाट्या असे विविध प्रॉप्स वापरले जातात. फोटो काढत असताना त्याचे चित्रीकरणही केले जाते. ज्याचे रूपांतर ङ्गप्री-वेडिंगफ व्हिडिओमध्ये होते. ङ्गप्री-वेडिंगफच्या माध्यमातून जोडपे एकमेकांना अधिक ओळखते, असे सांगितले जाते.

लग्नापूर्वीचा प्रवास साठवून ठेवण्यासाठी तसेच पहिल्या भेटीपासून ते लग्न होईपर्यंतच्या आठवणी जपण्यासाठी प्री -वेडिंग सर्वोत्तम माध्यम आहे. शहरात प्री-वेडिंगची क्रेझ वाढत आहे. या प्री-वेडिंगसाठी शहरातील पांडवलेणी, सोमेश्वर, पहिणे, त्र्यंबकेश्वर, गोदापार्क या ठिकाणांना पसंती दिली जात आहे. तसेच गावाकडचे वातावरणही प्री- वेडिंगला चांगले आहे.
-किरण मोरे, फोटोग्राफर

- Advertisment -

ताज्या बातम्या