Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकएबीबी कामगारांना सतरा हजार ९०० रुपये वेतन वाढ

एबीबी कामगारांना सतरा हजार ९०० रुपये वेतन वाढ

सातपूर । असोसिएशन ऑफ इंजिनीअरिंग वर्कर्स युनियन व एबीबी मॅनेजमेंट यांच्यात फेब्रुवारी 2019 ते फेब्रुवारी 2023 या कार्यकाळासाठी 17 हजार 900 रुपयांचा वेतनवाढीच्या करार करण्यात आला.

कंपनीच्या आवारात करण्यात आलेल्या करारावर युनियनच्या वतीने अध्यक्ष भूषण दत्ता सामंत यांच्या संमतीने युनियनचे सरचिटणीस काळवणकर, युनियनचे उपाध्यक्ष वर्गीस चेकोस, तसेच स्थानिक युनियन पदाधिकारी नरेंद्र गुरुंग, अशोक राजगुरू, देवेंद्र पाटील, मनोज पवार, मेघराज अहिरे तसेच कंपनीचे महाव्यवस्थापक गणेश कोठावदे, एचआर प्रमुख दयानंद कुलकर्णी, राहुल बढे, मनोज वाघ, सतीश कुमार विनय जोशी यांंनी स्वाक्षर्‍या केल्या.या वेळात कन्ट्री एचआर व्यवस्थापक गोपाला का, इ एल बिजनेस एच आर व्यवस्थापक सुजित जोसेफ व केट कोसो कंपनी युनियन कमेटी, बॉईज टाऊन पब्लिक स्कुल कमेटी, माझगाव डॉक कमेटी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

या करारांन्वये कामगारांना दर महा 17 हजार 900 रुपये, प्रोडक्शन इन्सेटिव्ह अशी पगारवाढ मिळणार आहे. त्याशिवाय इतर सवलतीमध्ये गृहकर्ज, दिवाळी एडव्हान्स, जेंकेट, शूज, शिफ्ट अलाउन्सआदीं मध्ये पण वाढ झालेली आहे.हा करार चार वर्षा करिता असून त्याची मुदत 10 फेब्रुवारी 2019 ते 10फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे. या करारानिमित्त कंपनीमध्ये झालेल्या कार्यक्रमाचे सूत्र संचलन मिलिद धोंडगे यांनी केले. आभार मनोज पवार यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन महेश गुंजाळ, मिलिंद धोंडगे, अतुल जाधव, हंसराज पवार, महेश धार्मिक व सहकार्याने केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या