इगतपुरी : बोरटेंभे शिवारात मालट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू
स्थानिक बातम्या

इगतपुरी : बोरटेंभे शिवारात मालट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी । मुंबई-आग्रा महामार्गावरील बोरटेंभे शिवारातील गुरुद्वारासमोर मुंबईहून येणाऱ्या भरधाव मालट्रकने एका पादचारीस पाठीमागुन जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यु झाला आहे.

शनिवारी ( दि.७ रोजी ) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास इगतपुरी शहराच्या बायपास जवळील बोरटेंभे शिवार येथील गुरूद्वारासमोर मुंबईहून नाशिककडे जाणारा मालट्रक ( क्रमांक- एम.पी.०९ एच.एच.८८०५ ) चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत असतांना रस्त्याने पायी चालणारा अनोळखी पादचारी इसम ( वय- ५० ते ५५ वर्ष ) नाव पत्ता माहीत नाही यास पाठीमागून धडक दिली.

या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. इगतपुरी पोलीसांनी भादवि २७९, ३०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन ट्रकचालक सचिनकांत शर्मा ( वय-३० ) राहणार ता. जि. भेंड, मध्यप्रदेश यास अटक केली आहे. अधिक तपास एएसआय एस. बी. घाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी लोहरे, पो. ना .संतोष गांगुर्डे आदी करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com