नाशिकचा स्मार्टरोड उद्यापासून दोन दिवस बंद; हे आहे कारण…
स्थानिक बातम्या

नाशिकचा स्मार्टरोड उद्यापासून दोन दिवस बंद; हे आहे कारण…

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

वकील परिषदेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार (दि.15) आणि रविवार (दि.16) सीबीएस ते मेहेर सिग्नल हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वकील परिषदेचा कार्यक्रम जिल्हा कोर्टात होणार असून, वाहनचालकांना दोन दिवस पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

राज्य स्तरीय वकील परिषदेच्या कार्यक्रमाला सुप्रीम कोर्टांचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासह सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत.

व्हीआयपी व्यक्तींच्या दौर्‍यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कोर्टासमोरून जाणार्‍या मार्गावरील वाहतूक पर्यांयी मार्गांनी वळविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

सीबीएस ते मेहेर सिग्नल चौक हा रस्ता दोन्ही बाजुने पूर्णत: बंद राहील. सीबीएस चौकाकडून मेहेरकडे जाणार्‍या वाहनांनी सीबीएसला डाव्या बाजुकडे वळून टिळकवाडी सिग्नलमार्गे इतरत्र जावे. मेहेरकडून सीबीएसकडे जाणार्‍या वाहनांना एमजीरोडकडून सांगली बँक सिग्नल मार्गे इतरत्र जावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com