नाशिक जिल्हा @७३२; नव्याने ३१ रुग्णांची भर; मालेगावमधील बाधित पोलिसांचा आकडा वाढला

नाशिक जिल्हा @७३२; नव्याने ३१ रुग्णांची भर; मालेगावमधील बाधित पोलिसांचा आकडा वाढला

नाशिक | प्रतिनिधी 

मालेगाव हा करोनाचा हॉटस्पॉट ठरला असून मालेगाव, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. आज दुपारी बारा वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील करोनाची ७३२ वर जाऊन पोहोचली आहे.  यामध्ये आज सकाळी २५ तर काल रात्री उशिरा सहा रुग्णांची भर पडली. मालेगावमध्ये काल १५५ रुग्ण करोनामुक्त झाल्यामुळे दिलासा मिळाल्यानंतर आणखी रुग्संख्येत भर पडल्यामुळे मालेगावात चिंतेत आणखीनच भर पडली आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात जवळपास २५ पोलिसांना करोनाची लागण झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

काल रात्री उशिरा नाशिक जिल्ह्यात सहा रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. यामध्ये शेवगे दारणा  येथील ४७ वर्षीय महिला,  कळवणच्या शिवाजी नगर येथील ११ वर्षांचा मुलगा, गवळी मंगल कार्यालय परिसरातील  ३७ वर्षीय व्यक्ती,  आगर टाकळी येथील २६ वर्षीय महिला, मालेगावातील इंदिरानगर येथील ४१ वर्षीय महिला पोलीस व मालेगावातीलच एसपीऑफीस परिसरातील ३३ वर्षीय पोलीसाला करोनाची लागण झाली होती. यावेळी एकूण ५६ अहवाल प्राप्त झाले. यात ४९ निगेटिव्ह तर सहा रुग्ण बाधित आढळले आहेत. तर दोघांची दुसरी टेस्ट पुन्हा एकदा बाधित आढळून आली आहे.

त्यानंतर आज सकाळी दहा वाजता १२६ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १८ बाधित आढळून आले आहेत तर १०८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये आडगाव पोलीस हेडक्वॉर्टर मधील २ पोलीस, जेलरोडमधील दोघे,  तांबे मळा, मखमलाबाद रोड  येथील एक, अशोका मार्ग १, रासबिहारी रोड १,  कामटवाडे २, पंचवटी १, धात्रक फाटा व पंचवटी १,  लोखंडे मळा १, पाथर्डी फाटा १,  हनुमान नगर १, घोटी टोल नाका १,  नाशिक पोलीस हेडक्वॉर्टर १ व  एसआरपीएफ अमरावतीच्या दोघा पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे.

यानंतर आज दुपारी बारा वाजेच्यास सुमारास  ६२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ५५ अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित सात अहवाल बाधित आढळून आले आहेत. या अहवालात राज्य राखीव दलाच्या सहा जवानांचा समावेश आहे. तर हिम्मतनगर पोलीस लाईनमधील १२ वर्षीय बालिकेला करोनाची लागण झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ७३२ वर पोहोचली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com