गरज पडल्यास ‘बार्न्स’ स्कूल येथे उभारणार क्वारंनटाईन हॉस्पिटल : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

jalgaon-digital
1 Min Read

इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या माध्यमातून सुक्ष्म नियोजनावर भर

नाशिक :  सद्य:स्थितीत संभाव्य क्वारंनटाईन होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता पुरेशी साधन सामुग्री व सोयी सुविधा पुरविण्याची क्षमता सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची असली तरी  गरज पडल्यास देवळाली कॅम्प परिसरातील ‘बार्न्स’ स्कूल येथे क्वारंनटाईन हॉस्पिटल उभारण्यास संबंधित संस्थेने संमती दर्शविली असून तेथे 200 खाटांचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने इर्मजन्सी सेंटरची स्थापन केली आहे. या सेंटरच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणा बरोबरचं दैनंदिन जनजीवनावर व अत्यावश्यक सेवांवर कुठलाही परीणाम होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे.

महिरावणी येथील संदिप फाऊंडेशन व लहवित येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना केअर सेंटर सुरु करणेबाबत आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच 600 डॉक्टर्स व 1200 नर्सेस यांना व्हेंटीलेटर सपोर्ट सिस्टम हाताळणे, लघुशिघ्रकृती आराखडा व मानक खबरदारी कशी घ्यावी याबाबत प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती श्री. मांढरे यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *