Thursday, April 25, 2024
Homeक्रीडानाशिक ते अमृतसर सोळाशे किमीच्या राईडला हिरवा झेंडा; एकाच वेळी करणार ५...

नाशिक ते अमृतसर सोळाशे किमीच्या राईडला हिरवा झेंडा; एकाच वेळी करणार ५ ब्रेव्हे

नाशिक | प्रतिनिधी

आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास मुंबई नाका येथून नाशिक ते अमृतसर या १६०० किमीच्या सायकल राईडला हिरवा झेंडा डॉ. महेंद्र महाजन यांनी दाखविला.  सुपर रॅन्डोनर मालिकेतील ऐतिहासिक ठरणाऱ्या सायकलिंग ब्रेव्हेमध्ये सुमारे 25 सायकलपटू सहभागी झाले असून हे सायकलपटू नाशिक ते अमृतसर हे १६०० किमी अंतर पार करणार आहेत.

- Advertisement -

2014 पासून नाशिकमधून सायकलिंग ब्रेव्हेज् चे (200 ते 1200 किलोमीटरच्या सायक्लोथन) आयोजन होत आहे. हे फ्रान्स क्लब, एसीपी (ऑडॅक्स क्लब पॅरिसियन) अंतर्गत ऑडॅक्स इंडिया रॅन्डोनरच्या (एआयआर) माध्यमातून यांच्याशी संबंधित आहेत. एसीपी, फ्रान्सची स्थापना 1904 मध्ये झाली. हा 115 वर्षे जुना क्लब असून या स्पर्धेचे आयोजन जगभरात 40 देशांमध्ये केले जाते.

रॅन्डोनर सायकलपटू 200 किमीचा प्रवास 13.5 तासात पूर्ण करतो. एका वर्षात 200 कि.मी., 300 कि.मी., 400 कि.मी. आणि 600 कि.मी.च्या ब्रेव्हेट्स पूर्ण करणाऱ्या सायकलिस्टला ‘सुपर रॅन्डोनर’ म्हटले जाते.

नाशिक ते अमृतसर हा एक आव्हानात्मक प्रवास असणार आहे. कारण यात सहभागी होणारा सायकलपटू (२०० कि.मी. + 300 कि.मी. + 400 कि.मी. + 600 कि.मी.) अशा सर्व ब्रेव्हे एकाचवेळी एकापाठोपाठ एक केवळ 5 दिवस आणि 6 तासात पूर्ण कराव्या लागणार आहेत. ही ब्रेव्हे 26 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता मुंबई नाका, नाशिक येथून सुरू होईल.  तर 31 डिसेंबर रोजी सायकलीस्टना रात्री साडेनऊ वाजेपर्यंत अमृतसर येथील सुवर्णमंदिर पर्यंत पोहचण्याचे आव्हान असेल. नव्या वर्षानिमित्त गुरुद्वारेत दर्शन घेण्याची संधी यानिमित्ताने सायकलपटूंना राहील.

नाशिक ते अमृतसर हा मार्ग महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या पाच राज्यातून जातो. रायडर्स धुळे ओलांडून मध्यप्रदेशात प्रवेश करतील. खालघाट (नर्मदा नदी ओलांडणे), मानपूर (इंदूरच्या आधी 60 कि.मी. अंतरावर) ते रतलाम, मंदसौर, नीमच मार्गे राजस्थानात प्रवेश करतील.

चित्तोडगड, भिलवाडा, किसनगड (अजमेर बायपास), रतनगड, सरदार, हनुमानगड पुढे हरियाणा – मंडी डबवाली आणि शेवटी पंजाब – भटिंडा, फरीदकोट, हरिके (सतलज नदी ओलांडणे), तरन तारण ते अमृतसर असा प्रवास असेल.

अशाप्रकारे सायकलिस्टना महाराष्ट्रातील तापी, मध्यप्रदेशातील नर्मदा आणि पंजाबमधील सतलज या मुख्य मोठ्या नद्या पार कराव्या लागतील. राजस्थानात हरण अभयारण्य तसेच वालुकामय वाळवंटच्या परिघाला लागूनच ही मार्गिका असेल.

अशी असेल 1600 किमीची ब्रेव्हे :-

पहिली ब्रेव्हे – 600 किमी – नाशिक (26 डिसेंबर सकाळी 6 वाजता) रतलाम (मध्यप्रदेश) मार्गे मंदसौर (27 डिसेंबर रात्री 10 वाजता)

दुसरी ब्रेव्हे :- 200 किमी – मंदसौर (दि. 28 डिसेंबर, सकाळी 7 वाजेपासून) राजस्थान मधील रूपाहेली (भिलवारा ते अजमेर दरम्यान आहे.) 28 डिसेंबर रात्री साडेआठपर्यंत पोहचणे अनिवार्य असेल.

तिसरी ब्रेव्हे :- 400 किमी – रूपाहेली (29 डिसेंबर सकाळी 6 वाजता) ते बिसरसेर अशी (30 डिसेंबर सकाळी 9 वाजेपर्यंत) ही राईड असेल. बिसारसेर किसनगड – हनुमानगड महामार्गावरील सारदशर शहराजवळ आहे.

चौथी ब्रेव्हे :- 300 किमीची शेवटची ब्रेव्हे बिसारसेर (30 डिसेंबर दुपारी 4 वाजता) पासून पंजाबमधील सतलज नदीच्या किनाऱ्यावरील राम लहरा रोही पर्यंत (31 डिसेंबर रात्री 12 वाजता) असेल. रायडरला प्रत्येक राइड एका निश्चित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे रायडर्स 1500 किलोमीटरच्या सुपर रॅन्डोनर राईड्स 5 दिवस आणि 6 तासात पूर्ण करतील. पुढे ही मोहीम पूर्ण करण्याच्या उद्देशाने 31 डिसेंबर दुपारी 2 वाजेपासून सुवर्ण मंदिर, अमृतसरला जाण्यासाठी १०० किमी लांबीची ब्रेव्हेट पॉप्युलर राइड आयोजित करण्यात आली आहे.  रायडर्स 5 दिवस 15 तास 30 मिनिटांत एकूण 1600 किलोमीटर चालतील.

रायडर्सची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे म्हणून हेल्मेट आणि रिफ्लेक्टीव्ह वेस्ट/जाकीट परिधान करून राईड करणे अनिवार्य आहे. सायकलला पुढे प्रकाश दिवा आणि मागील लाल दिवे असावेत. सर्व चालक रस्त्याच्या डाव्या बाजूने एकामागून एक सायकल चालवतील.

ही असतील आव्हाने :

उत्तरेकडे जाताना मोठ्या हो जाणाऱ्या रात्री हे एक मोठे आव्हान असेल. तसेच सकाळी धुके येण्याची शक्यता आहे. रायडर्सना सायकलचे मेकॅनिकल ब्रेक डाऊन आणि भोजन स्वतः व्यवस्थापित करावे लागेल. रँडन्युअरिंगच्या खर्‍या प्रेरणेने वाटचाल करताना रायडर्स एक गट करून एकमेकांना मदत करतात.

ही शर्यत नसल्यामुळे आणि निर्धारित वेळेत प्रत्येक ब्रेव्हेट पूर्ण करणारे सर्वच विजेते असणार आहेत. प्रत्येक राइडर उत्तम प्रयत्न करीत आहे, सर्व शक्यतांचा प्रतिकार करीत त्यांच्या शारीरिक आणि मानसिक मर्यादांवर मात करण्याची आवश्यकता आहे. शेवटी कर्तृत्वाची भावनाच महत्त्वाची असते.

विविध शहरांतून वेगवेगळ्या क्षेत्रांतील 24 पुरुष आणि दोन महिला रायडर अनिता गुप्ता (मुंबई), पुणे येथील प्रीती म्हस्के मोहिमेत सहभागी होणार आहेत.

हे आहेत रायडर्स :

बेंगळुरूचे विभाव शिंदे, कोलकाताचे देबंजन डे, नाशिकमधून समीर मराठे, दत्तात्रय चकोर, बाळासाहेब वाकचौरे, किशोर काळे, डॉ. हिमांशु थुसे, रतन अंकोलेकर, प्रमोद तुपे, राहुल सोनवणी, रामदास सोनवणे, गोरक्षनाथ शिंदे, विजय काळे, दिपक वाघ हे १२ सायकलिस्ट, पुण्यातून योगेश भट, नागामलेश्वर राव आणि मयूर शानभाग हे तीन चालक आहेत.  मुंबईतून शशिकांत पाटोळे, प्रशांत पाटील, सतीश शर्मा, श्रीकांत दळवी, नरेंद्र मार्स्कोल्हे आणि अष्टम आशान तर धुळे येथील रवी हिरानी धुळे येथून सहभागी होणार आहेत.

मोहोमेची मार्शेलिंग करणे हे एक जबाबदारीचे काम आहे. यशवंत मुधोळकर आणि चंद्रकांत नाईक (ज्येष्ठ सायकलस्वार), वाहनचालक संदीप परब आणि दिनेश मोरे यासह दोन वाहने चालकांवर नजर ठेवून त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या