अल्पवयीन मुलीवर अत्याचार
स्थानिक बातम्या

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी 

पंचवटीतील जाजूवाडीमध्ये एकाने अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या घटनेत अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली असून संशयित प्रज्ज्वल श्रीकृष्ण मेश्राम (21,रा. अकोट, जि. अकोला) या संशयितांविरोधात पोस्को व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या फिर्यादीनुसार, प्रज्ज्वल याने अज्ञानाचा गैरफायदा घेत, 18 ते 25 मे 2019 या दरम्यान तिच्या राहत्या घरात अत्याचार केला. तसेच, तिचे नग्न छायाचित्र मोबाईलमध्ये काढून तिच्या आई व भावाला दाखविण्याची धमकी दिली.

याप्रकारातून पीडिता गरोदर राहिल्याने तिने मुलास जन्म दिला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला उपनिरीक्षक डी. एस. पाटील करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com