गतिमंद मुलीवर सामुहिक अत्याचार; चौघा नराधमांना अटक
स्थानिक बातम्या

गतिमंद मुलीवर सामुहिक अत्याचार; चौघा नराधमांना अटक

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगत असलेल्या खुंटविहीर येथे एका गतिमंद विवाहितेवर चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. १६) मध्यरात्री एक ते सकाळी आठ वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी दीपक काशीराम पवार, रा. खुंटविहीर, दीपक आनंदा पवार, रा. मोहपाडा (खु), सुरेश शिवराम शेवरे, रा. मालगोंदा, अशोक उणाजी गायकवाड, रा.भाकुर्डी, ता. कळवण यांनी मद्याच्या नशेत हे कृत्य केल्याचे समजते.

या चौघांनी गतिमंद विवाहितेस फूस लावून गावाच्या पश्चिमेस खुंटविहीर परिसरातील एका शेतातील झापावर नेले व आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला, अशी फिर्याद देण्यात आली आहे.

रात्री कुठे होतीस, अशी विचारणा पीडितेच्या बहिणीने सकाळी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. याबाबत पीडितेच्या बहिणीने तिच्या गतिमंद बहिणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची फिर्याद पोलिसांत दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना अटक केली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक बोडखे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान कळवणचे पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी घटना समजताच तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व योग्य ते सबळ पुरावे हाती आल्यास संशयित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com