संतापजनक : युवकांवर गावगुंडांचा रात्रभर अत्याचार; मारहाणीसह केला लैंगिक छळ
स्थानिक बातम्या

संतापजनक : युवकांवर गावगुंडांचा रात्रभर अत्याचार; मारहाणीसह केला लैंगिक छळ

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

गुंडांच्या वाढदिवसात डीजे वाजवणे लवकर बंद केल्याने हवेत गोळीबार करून डिजी वाजवणार्‍या दोन युवकांवर 10 ते 12 गुंडांनी रात्रभर अत्याचार केल्याचा प्रकार तालुक्यातील दरी-मातोरी परिसरात गुरूवारी (दि.9 ) रात्रभर घडल्याचा प्रकार समोर आला आहे. अत्याचारांमध्ये कपडे काढून गुप्त अंगांवर सिगारेटचे चटके, बेल्टने, बांबुने मारहाण, विजेचा शॉक यासह दारूच्या बाटल्या तसेच लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणातील पिडीत युवक उपचारांसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दरी मातोरी येथील बाणगंगा या फार्महाऊसवर गरूवारी रात्री ते शुक्रवारी पहाटे 4 पर्यंत हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश काजळे याने वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त बाणगंगा फार्महाऊसवर डीजे वाजवण्याची सुपारी पंचवटीतील दोन युवकांना दिली होती. त्यानुसार गुरूवारी सायंकाळी अजून एका युवकास सोबत घेऊन तीघे दरी मातोरी येथे डिजे घेऊन गेले होते.

पार्टी रात्री 10.30 नंतरही सुरू राहिल्याने सदर युवकांनी नियमानुसार डीजे वाजवता येत नसल्याने पुढे डीजे वाजवण्यास नकार दिला. याचा राग आल्याने मद्यधुंद 8 ते 10 जणांनी हवेत गोळीबार करून डीजे वादक युवकांना बेदम मारहाण सुरू केली. यातील एका युवकाने कामास जायचे असल्याचे सांगत सुटका करून घेतली.

तर गुंडानी याहीपुढे जात उरर्वीत दोघांना त्यांचे कपडे काढण्यास भाग पाडून रात्रभर अंगावर थंड पाणी ओतणे, त्यांना बेल्ट, काठ्यांनी उघड्या अंगावर मारहाण करणे, सिगारेटचे गुप्तांगवर चटके देणे, पाण्याची भांडी डोक्यात मारणे, विजेचा शॉक देणे तसेच दारूच्या बाटल्या गुप्तांगात घालण्याचा तसेच अत्याचाराचा प्रयत्नही केल्याचे पिडीतांनी सांगितले.

पहाटे चार पर्यंत युवकांवर हे अत्याचार सुरू होते. यामुळे युवक जखमी झाले आहेत. आम्ही एका आमदाराचे नातेवाईक असून हा प्रकार कोणास सांगीतल्यास जीवे ठार मारण्याच्या धमक्या युवकांना देण्यात आल्या आहेत. अखेरीस सकाळी त्यांची गुंडाच्या तावडीतून सुटका झाली कसाबसा जीव वाचवत त्यांनी घर गाठले.

संपूर्ण आपबीती मित्रांना कथन केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. या युवकांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

नागरीकांचा संताप

हा प्रकार समोर येताच पंचवटी, पेठरोड परिसरातील नागरीकांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी केली होती. जिल्ह्यात मुली सुरक्षीत नाहीत परंतु युवकांवरही असे अत्याचार होत असल्यास पोलीस झोपा काढत आहेत काय असा संतत्प प्रश्न उपस्थित करत या प्रकरणी सबंधीत गुंडांवर कडक कारवाईची मागणी नागरीकांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com