पंचवटीतील नवनाथनगरमध्ये महिलेवर अत्याचार
स्थानिक बातम्या

पंचवटीतील नवनाथनगरमध्ये महिलेवर अत्याचार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

पंचवटीतील नवनाथनगरमध्ये पती व मुलांना ठार करण्याची धमकी देत एका विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना घडली. संशयित आरोपी हा या कुटुंबाच्या ओळखीतला असून चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

अधिक माहिती अशी की, १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नवनाथनगर मधील एका चाळीत संशयित आरोपी नानजी भाई काकड चौधरी (वय 45 रा. मोठी पळसन ता. कपराडा जि.बलसाड राज्य गुजरात) याने पिडीत महिलेला धमकी देत मद्य सेवन करण्यात भाग पाडले. तसेच यावेळी  त्याने स्वतःही मद्य प्राशन करून महिलेवर अत्याचार केला.

यावेळी पिडीत महिलेने विरोध केला असता पती व मुलांना ठार करण्याची धमकी दिली तसेच चाकूचा धाक दाखवून बळजबरी करत अत्याचार केल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुरनं 0152/2020 भा.द.वि.क. 376, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी एम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com