Video : नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा ‘बाला’ डान्स व्हायरल
स्थानिक बातम्या

Video : नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा ‘बाला’ डान्स व्हायरल

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा घरगुती कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमुळे आपल्या शिस्तप्रिय स्वभावाने ओळखल्या जाणाऱ्या  नांगरे पाटील यांची एक खुबी यानिमित्ताने समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये नांगरे पाटील आपल्या नातलग आणि मित्रपरिवारासोबत ‘बाला’ या अलीकडेच प्रसिद्धीस आलेल्या गाण्यावर डान्स करताना नजरेस पडत आहेत.

सर्वात जलद संपर्काचे मध्यम असलेल्या सोशल मीडियात काही क्षणातच हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला असून या व्हिडीओला भरभरून लाईक्सदेखील मिळाल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियात स्टेट्स ठेवून माणूस कितीही शिस्तप्रिय असला तरी त्याला खासगी आयुष्य असते. मित्रांसोबतचा नांगरे पाटील यांचा व्हिडीओ नक्की बघा या आशयाच्या शीर्षकाने हा व्हिडीओ सोशल मीडियात सध्या व्हायरल झाला आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ आपल्या भाचीच्या लग्नातला असून यावेळी कुणीतरी तो रेकॉर्ड केला आणि व्हायरल केल्याचे नांगरे पाटील यांनी ‘देशदूत’शी बोलताना सांगितले. खासगी व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असल्यामुळे नांगरे पाटलांनी नाराजी मात्र व्यक्त केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com