Thursday, April 25, 2024
Homeनाशिककम्युनिटी स्प्रेडमुळे होतोय नाशकात करोनाचा फैलाव; काल आढळून आलेल्या रुग्णांची अशी आहे...

कम्युनिटी स्प्रेडमुळे होतोय नाशकात करोनाचा फैलाव; काल आढळून आलेल्या रुग्णांची अशी आहे ‘हिस्ट्री’

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरात काल ३१ रुग्ण बाधित आढळले. एकाच कुटुंबातील रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे.त्यामुळे प्रशासनापुढे करोना आटोक्यात आणण्यासाठीचे मोठे आवाहन उभे ठाकले आहे. कालच्या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे  नाशिक शहरातील रुग्णसंख्या४६१ वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये १६३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर सध्या २७७ रुग्ण शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे नाशिकमधील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढली असून ९१ एवढी झाली आहे.  नाशिक शहरात आतापर्यत २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

बघुयात काल नाशिक शहरात आढळून आलेल्या रुग्णांची काय होती हिस्ट्री

१) अमरधाम रोड द्वारका येथील ४३ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.

२) अमरधाम रोड कुंभारवाडा येथील ३४ वर्षीय महिला, ८० वर्षीय वृद्ध महिला व ३६वर्षीय व्यक्ती व १५ वर्षीय मुलगा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

३) अमरधामरोड, साईबाबा मंदिर येथील ६ महिन्याच्या बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

४) पंडित नगर सिडको येथील १८ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

५) नाईकवाडी पुरा, जुने नाशिक येथील २७ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.

६) सिडको नाशिक येथील ३६ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

७)पेठरोड, पंचवटी येथील ५५ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.जुन्या रुग्णच्या संपर्कातील आहे.

८) शितळादेवी मंदिर अमरधाम रोड परिसरातील ८५ वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

९) सुभाष रोड,नाशिकरोड येथील ५५ वर्षीय महिला कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.

१०)६९ वर्षीय वृद्ध महिला रा.अजमेरी मजीद, जुने नाशिक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

११) महाराणा प्रताप नगर,पेठरोड येथील ६५ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

१२) मेरी दिंडोरी रोड येथील ६० वर्षीय वृद्ध महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

१३) खडकाळी भद्रकाली येथील ४३ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

१४)आझाद चौक जुने नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.

१५) बागवान पुरा रूम नंबर ३७९९ येथील ४२ व २५ वर्षीय महिला ,५० वर्षीय वृद्ध महिला, ५ वर्षीय बालक कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

१६) बदर मंझिल येथील ३७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

१७) सिन्नर फाटा, नाशिकरोड येथील ६७ वर्षीय वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

१८) सुशील बंगलो, भाभानगर, मुंबई नाका, येथील ४१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

१९)कोकणीपूरा, सारडा सर्कल येथील ६८ वर्षीय वृद्ध कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

२०) ओम साई पार्क, पिंगळे नगर, पेठरोड येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोरोना बाधित झाले असून त्यात ४१ व ३८ वर्षीय पुरुष व २४ वर्षीय महिलेचा समावेश आहे.यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

२१) लीला स्मृती बंगला,टी. बी.सँनिटोरियम जवळ,दिंडोरी रोड येथील ३५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

२२)बजरंग नगर आनंदवल्ली येथील ३९ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या