जिल्हा रुग्णालय
जिल्हा रुग्णालय
स्थानिक बातम्या

शुभवार्ता : नाशिकच्या करोनाबाधित रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

निफाड तालुक्यातील ज्या करोना बाधित रुग्णामुळे प्रशासन व जिल्हावासिय चिंतेत होते, त्या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच हा रुग्ण करोना मुक्त होईल, अशी ‘शुभ वार्ता’ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली आहे.

करोना ने सर्वत्र थैमान घातलेले असतांना निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजिक येथे करोना बाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती, करोना विषाणू ग्रामीण भागात पोहोचल्याचे या घटनेने स्पष्ट झाले होते, जिल्हा प्रशासन, जिल्हा रुग्णालय यांनी या रुग्णावर तातडीचे उपचार करण्याबरोबरच निफाड तालुक्यातही विविध उपाय योजना केल्या होत्या.

करोना बाधित रुग्णाचा बचाव करण्याचे मोठे आवाहन आरोग्य यंत्रणेपुढे होते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील टीमने अहोरात्र मेहनत घेऊन रुग्णावर उपचार केले.

त्यामुळे त्याच्या जीविताला असलेला धोका दूर झाला आहे. पुढील काळात आवश्यक त्या चाचण्या करून रुग्णाला घरी सोडण्यात येईल, अशी माहिती डॉ. जगदाळे यांनी दिली, हा रुग्ण करोना मुक्त होणे, ही समाधानाची बाब असल्याचेही डॉ.जगदाळे यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com