नाशिक शहर पोलिसांकडून व्हाँटस्अँप हेल्पलाईन सुरु
स्थानिक बातम्या

नाशिक शहर पोलिसांकडून व्हाँटस्अँप हेल्पलाईन सुरु

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमाव आणि संचारबंदी आदेश लागू झाल्याने वाहन वापर आणि वाहतूकीस मनाई करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा,जीवनाश्यक सेवा यासाठी येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी शहर पोलिसांनी व्हाँटस्अँप हेल्पलाइन सुरु केली आहे. यासाठी ११ क्रमांक जाहिर करण्यात आले आहेत.

लाँकडाऊनच्या धर्तीवर पोलीसांनी यापुर्वीच साहायता कक्ष स्थापन केला असून, कर्तव्यावर असलेल्या यंत्रणेची अडवणूक होवू नये यासाठी कक्षातून कामकाज चालत आहे.

शहर पोलीस हद्दीत सीआरपीसी १४४ (१) (३) प्रमाणे वाहन वापरास व वाहतुकीस मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशातून पोलीस, आरोग्य, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापन आदी यंत्रणांच्या कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी वगळण्यात आले असले तरी संबधीतांना जीवनावश्यक आणि अन्य आवश्यक सेवा बजावत असतांना त्रास होवू नये.

तसेच संपर्कात अडचणी येऊ नये यासाठी आता व्हाँटस्अँप हेल्पलाईन सुरू करण्यात आले आहेत.

असे आहेत क्रमांक

 • ७२४८९२२८७७
 • ९४०३१६५१३२
 • ७७०९२९५५३४
 • ७२४८९०६८७७
 • ७०५८९४६८७७
 • ७२४८९०३८७७
 • ८४८५८१०४७७
 • ९३७३८३३४१९
 • ७३५०१६६९९९
 • ७०२०५८३१७६
 • ९४०३१६५१४०

अौद्यागिक परवानगी साठी – ०२५३२९७१२३
आँनलाईन फाँर्म
http://corona.nashikcitypolice.gov.in

Deshdoot
www.deshdoot.com