नाशकातील पहिला पोलीस कर्मचारी ‘करोनामुक्त’
स्थानिक बातम्या

नाशकातील पहिला पोलीस कर्मचारी ‘करोनामुक्त’

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

जुने नाशिक | वार्ताहर

भद्रकाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुनील वाळे यांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीतील पहिल्या पोलीस कर्मचाऱ्यांस करोनाची लागण झाली होती.

मात्र, या कर्मचाऱ्याने करोनावर यशस्वी मात केल्यानंतर गुरुवारी (दि 11) स्वागत करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त मगलसींग सूर्यवंशी, भद्रकाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे , मुबई नाका वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आदी सह परिसरातील नागरिकांनी औन्क्षण करत फुलांची उधळण करत या कर्मचाऱ्याचे स्वागत केले.

यावेळी वाळे यांनी सर्वांचे आभार मानत करोना आजार घाबरून न जाता खबदारी घेतल्यास कोरोना यशस्वी मत करू शकतो. सर्व अधिकारी कर्मचारी माझ्याशी पाठमागे राहून खंबीर पणे साथ दिल्याने मी लवकर बरा झालो अशी प्रतिक्रिया ‘देशदूत’कडे व्यक्त केली.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com