‘सीईटी’चे संभाव्य वेळापत्रक जाहीर; दोन टप्प्यात परीक्षा
स्थानिक बातम्या

‘सीईटी’चे संभाव्य वेळापत्रक जाहीर; दोन टप्प्यात परीक्षा

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलने पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी 14 ऑनलाईन प्रवेश परीक्षांचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इंजिनिअरिंग, बीफार्म, डीफार्म, कृषी, फिशरी, डेअरी टेक्नॉलॉजी पदवी अभ्यासक्रमांसाठी होणारी एमएचटी-सीईटी परीक्षा 13 ते 23 एप्रिल या कालावधीत दोन टप्प्यांत होणार आहे.

एमबीएची सीईटी 14 आणि 15 मार्च रोजी होणार आहे. एलएलबी अभ्यासक्रमासाठी (तीन वर्षे) सीईटी 28 जून आणि एलएलबी (पाच वर्षे) अभ्यासक्रमासाठी सीईटी 12 एप्रिला होणार आहे. या कालावधीमध्ये विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी त्यांच्या परीक्षा आणि सीईटींचे आयोजन करू नये, अशा सुचना सीईटी सेलने दिल्या आहेत. वेळापत्रकानुसार एमसीए अभ्यासक्रमासासाठी सीईटी 18 मार्चला, एमआर्च आणि हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या पदवी अभ्यासक्रमासाठीची सीईटी 10 मे रोजी, तर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीची सीईटी 16 मे रोजी घेण्याचे नियोजन आहे.

यासोबतच एमसीए अभ्यासक्रमासाठी सीईटी 28 मार्चला होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांसाठी या सर्व प्रवेश परीक्षांची माहिती, सविस्तर अभ्यासक्रम आणि परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठीची लिंक यांची माहिती सीईटी सेलच्या हीींिीं://ुुु.ारहरलशीं.ेीस वेबसाइटवर प्रकाशित केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या वेबसाइटव्यतिरिक्त इतर कोणत्याही वेबसाइटच्या माहितीवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी केले आहे.

राज्य प्रवेश परीक्षा कक्षाची प्रवेश नियंत्रण प्राधिकरणासमावेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या विविध व्यावसायिक व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com