Sunday, April 28, 2024
Homeनाशिकमहापालिकेच्या प्रवेशद्वारावर बसवले विशिष्ट उपकरण; अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘अभय’

महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बसवले विशिष्ट उपकरण; अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘अभय’

नाशिक | प्रतिनिधी 

महानगरपालिकेकडून कोरोना कोविड-१९ टाळण्यासाठी विविध योजना राबवित असताना मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील प्रवेशद्वारावर ‘अभय’ नावाचे युमीफायर प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आले आहे.

- Advertisement -

महापालिका मुख्यालयात येणाऱ्या अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने अभय’ नावाचे युमीफायर हे  आवश्‍यकतेनुसार आर्द्रता निर्माण करणारे साधन आहे.

आत्ता पर्यंत स्प्रिंकलर, शॉवरच्या माध्यमातून बाहेर पडणाऱ्या थेंबांचा आकार हा ८००ते ९०० मायक्रॉन इतका असल्याने त्यात व्यक्ती ओली होत असे मात्र हे मशीन मिनिटाला १ लाख ७० हजार ००० वेळा व्हायब्रेट होऊन सॅनिटायझरचे रूपांतर अवघ्या ३ मायक्रॉनच्या थेंबामध्ये करते.

त्यामुळे आकाशात ज्याप्रमाणे ढग दिसतात त्याप्रमाणे वातावरण तयार होते व त्या वातावरणात त्या व्यक्तीचा प्रवेश झाल्यानंतर ती व्यक्ती पूर्णतः सँनिटाईझ होते.

या साधनाची सात फूट उंची चार फूट लांब व तीन फूट रुंद असा पूर्णता पारदर्शी असून प्रवेशाची व बाहेर पडण्यासाठी पारदर्शक असा पडदा दोन एम.एम. मध्ये लावण्यात आला आहे.

अभय’ नावाचे युमीफायर आरकीन व्हेंचर प्रा.ली,नाशिकचे संचालक सुरेश कापडिया यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आले आहे. त्याची पाहणी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली यावेळी त्यांच्या समवेत शहर अभियंता संजय घुगे,कार्यकारी अभियंता सी.बी.आहेर,सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ सचिन हिरे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या