ब्रॅन्ड्स फॅक्टरीचा ‘रॉक बॉटम विक’; 50 ते 20 टक्के भरघोस सवलत, कॅश व्हाऊचर्ससुद्धा
स्थानिक बातम्या

ब्रॅन्ड्स फॅक्टरीचा ‘रॉक बॉटम विक’; 50 ते 20 टक्के भरघोस सवलत, कॅश व्हाऊचर्ससुद्धा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमधील पिनॅकल मॉल येथे सुरू झालेल्या ब्रँड फॅक्टरीने भरघोस सवलतीचा रॉक बॉटम विक सुरू केला आहे. यामध्ये ग्राहकांना दोन हजाराच्या खरेदीवर 20 टक्के अतिरिक्त सूट तर 4 हजाराच्या खरेदीवर 30 टक्के सूट मिळणार आहे.

विशेष म्हणजे ग्राहकांना वरील खरेदीवर मार्च महिन्यापर्यंत चालू शकणारे 500 रुपयांचे कॅश व्हाऊचरदेखील मिळणार आहे. हा सेल आजपासून 23 फेब्रुवारीपर्यंत चालेल.

इंडिगो नेशन, फ्लाईंग मशीन, ली, रेंगलर, लॉमन, नाईटहूड, पीटर इंग्लंड, जारा, प्रिव्हिलेज क्लब, जॉन मिलर, स्कलर्स, ट्विल्स, व्रोगन, क्रोकोडाईल, ली कूपर, अदिदास, रिकॅप, मिनरल, इकटतारा, सृष्टी, नयन, मोरपंख, अतिसा, गुलाबी आणि निळा, फिला, डीजे अ‍ॅण्ड सी अशा नामांकित ब्रँडस्वर भरघोस सूट देण्यात येणार आहे.

आपल्याजवळील ब्रँड फॅक्टरीच्या स्टोअरला भेट देऊन या सवलतीचा लाभ ग्राहक उठवू शकणार असल्याचे ब्रँडस् फॅक्टरीकडून सांगण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com