अनेक रोइंगपटू देणारा नाशिकचा ‘बोटक्लब’

अनेक रोइंगपटू देणारा नाशिकचा ‘बोटक्लब’

नाशिक | दिपाली गडवजे 

चिकाटी, संघर्षाचा खेळ म्हणून रोइंगकडे बघितले जाते. रिओ ऑलिम्पिक्समध्ये समूह गटात जे सुवर्णपदक खेळाडू दत्तू भोकनळला मिळाले ते याच बोटिंग क्लबमध्ये सराव करून.  गोदेच्या काठावर वसलेल्या केटीएचएम कॉलेजमध्ये दिवंगत डॉ. वसंतराव पवार यांच्या दूरदृष्टीमुळे वॉटर स्पोर्ट बहरला आहे. याच जागेवर बोटिंग क्लब सुरु करून रोइंगचे खेळाडू घडत आहेत.

नाशिकमधील काही तरुण पुण्यात शिक्षण घेत असताना नाशिकमध्येही बोटक्लब असावा असे त्यांचे स्वप्न होते. त्या स्वप्नाला आकार देण्यासाठी नाशिकमध्ये खऱ्या अर्थाने बोट क्लब सुरु झाला.

नाशिकमध्ये रोइंगची सुरुवात १९९५-९६ पासून झाली. तत्पूर्वी केटीएचएम कॉलेजचा एकमेव बोट क्लब होता. रोइंगमध्ये १९९५मध्ये केटीएचएमच्या १४ खेळाडूंनी पुणे विद्यापीठाच्या संघात प्रथमच स्थान मिळविले.

त्या वेळी ही कामगिरी नाशिकच्या इतिहासातली सर्वोच्च मानली जात होती. यात ८ मुले आणि ६ मुलींचा समावेश होता. राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकने दरवर्षी पदक घेतले असून, सध्या १०० पेक्षा अधिक राष्ट्रीय खेळाडू नाशिकमध्ये आहेत.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंनी वॉटर स्पोर्ट्‍सला खऱ्या अर्थाने चालना दिली आहे. केटीएचएम कॉलेजचा बोट क्लब जिल्ह्यातील सर्वांत पहिला. त्यानंतर घारपुरे घाटावर बोट क्लब सुरू झाला. नाशिक शहरात दोन बोट क्लब असूनही शहरातली मुले या खेळाकडे फारसे वळत नसल्याने खंत व्यक्त व्हायची. मात्र अलीकडे याठिकाणी प्रवेश वाढले असून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रशिक्षित केले जात आहे.

नाशिकमधील या बोटक्लबची स्थापन १९८६ मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे क्रिडा मंत्री श्री. शामराव अष्टेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

तसेच या बोट क्लबच्या अध्यक्ष.निलिमा पवार ( अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक) आहेत. उपाअध्यक्ष डॉ. व्ही.बी.गायकवाड ( प्राचार्य केटीएच एम कॉलेज नाशिक) हे आहेत. या बोट क्लब चे मुख्य उद्दिष्ट असे की ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना बोट क्लब उपलब्ध करून द्यावा व पाण्यातील खेळांचे महत्व व त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापना करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यातून पुढे जाऊन त्यांनी संस्थेचे व देशाचे नाव मोठे करावे हा उद्देश आहे. त्यांना त्यांच्या कलागुणांना सादर करण्यासाठी एक व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे . ५९६.३२ चौरस मीटर चा हा बोट क्लब असून अनेक विद्यार्थी येथे दररोज सराव करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या बोटी येथे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

बोटींची संख्या

१) ट्रेनिंग बोट – ०४
२) रोविंग बोट – १४
३)कॅनॉ बोट-०६
४)प्लेजर बोट- ०९
५)कॅनॉ आणि कायकिंग बोट- १८

या व्यतिरिक्त देखील भरपूर उपयोगी साहित्य आहेत. दरवर्षी या बोट क्लब चे विद्यार्थी वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धांमद्ये भाग घेतात व संस्थेचे नाव मोठे करतात.

आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना पुरस्कार देखील मिळाले आहेत. अखिल भारतीय रोईंग विद्यापीठ स्पर्धा २०१९ चंदीगड पंजाब येथे २४ फेब ते १ मार्च २०१९ पर्यंत आयोजित करण्यात आलेली होती त्यात देखील संस्थेच्या ४ खेळाडुनी कांस्य पदक मिळवली आहे.

अखिल भारतीय कॅनॉ आणि कायकिंग विद्यापीठ स्पर्धा २०१९ ही पठाणकोठ जमू काश्मीर येथे १८ मार्च ते २१ मार्च २०१९ ला आयोजित करण्यात आलेली होती येथे देखील संस्थेच्या २ विध्यार्थ्यांनी कांस्य पदक मिळवत संस्थेची मान उंचावली आहे.

३९ वे ओपन नॅशनल चॅम्पियनशिप हैद्राबाद २०१९

मुली पियर- १) कोमल बोडके व भाग्यश्री चव्हाण यांनी रौप्य पदक मिळवली आहेत.

४ थी इंटर स्टेट चॅलेंजर रोईंग नॅशनल चॅम्पियनशिप २०१९ पुणे

८ खेळाडूंचा सहभाग

१)कोमल बोडके व भाग्यश्री चव्हाण यांनी सुवर्ण पदक मिळवली.

अखिल भारतीय अंतर विद्यापीठ २०२० चंदीगड साठी एकूण ८ मुली व ६ मुले अशी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थी जोमाने सराव करत आहेत. दरवर्षी २० ते ३० नवीन प्रवेश घेतले जातात. सर्व विद्यार्थी मिळून येथे सराव करतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com