राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री व नाशिकच्या पालकमंत्र्यांचे ‘भुजबळ फार्म’ क्वारंटाइन

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री व नाशिकच्या पालकमंत्र्यांचे ‘भुजबळ फार्म’ क्वारंटाइन

नवीन नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेकडून हा परिसर तीन किमीपर्यंत सील करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच परिसरात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निवासस्थान म्हणजेच भुजबळ फार्म देखील याच परिसरात असून तेदेखील क्वारंटाइन क्षेत्रात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील दुसरा आणि शहरातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह  रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. काल (दि. ०६) रात्री उशिरा महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये प्राप्त अधिकारांचा वापर कर तीन किमी त्रिज्या असलेला परिसर सील करण्याचे आदेश काढले आहेत.

काल (दि. ०६) रोजी गोविंद नगर परिसरातील  मनोहर नगर येथील एक दिल्लीला जाऊन आलेला रुग्ण कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आला. यानंतर मनोहरनगर केंद्र स्थानी ठेऊन 3 किलोमीटर त्रिज्या पर्यंतचा परिसर १४ दिवस सील करण्यात आला आहे.

यापार्श्वभूमीवर महापालिका आणि पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले असून संपूर्ण क्वारंटाइन परिसरात जंतुनाशक फवारणी केली जात आहे. आज सकाळपासूनच पोलिसांकडून गोविंदनगर परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.   ठिकठिकाणी दोरखंड बांधण्यात आले आहेत.

तर अनेक ठिकाणी दगड रस्त्यावर टाकून रस्ता रहिवाशांनी बंद केला आहे. गोविंद नगर आणि मनोहरनगर परिसरातील आजचे काही फोटो. (क्रेडीट : सोशल मीडिया)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com