आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार निषेध दिवस : गेल्या एक वर्षात राज्यातील ५५ टक्के लोकांनी दिली लाच
स्थानिक बातम्या

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार निषेध दिवस : गेल्या एक वर्षात राज्यातील ५५ टक्के लोकांनी दिली लाच

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : इंडिया भ्रष्टाचार सर्वेक्षण (इंडिया करप्शन सर्वे -२०१९)) ने देशातील भ्रष्टाचाराचा अहवाल जारी केला आहे. यामध्ये राज्यातील ५५टक्केपेक्षा अधिक लोकांनी मागील एका वर्षात लाच दिल्याचे आढळून आले आहे.

भारतीय भ्रष्टाचार सर्वेक्षण २०१९ च्या या अहवालात देशभरातून ८० हजारापेक्षा अधिक लोकांवर हा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये १ लाख ९० हजारहून अधिक प्रतिसाद मिळाले आहेत. त्यापैकी राज्यतील ५ टक्के लोकांनी सांगितले कि, गेल्या १२ महिन्यांत त्यांना एकदाच लाच द्यावी लागली. यामध्ये जास्तीत जास्त पोलिस आणि महानगरपालिका विभागांचा समावेश आहे. या सर्वेक्षणात भ्रष्टाचाराच्या पहिल्या आठ राज्यांचादेखील समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान सर्वेक्षणाचे हे तिसरे वर्ष असून ‘इंडिया करप्शन सर्व्हे २०१९’ या सर्वसमावेशक अहवालात ही संकलित करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण राज्य स्तरावरही करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातून ६ हजार ७०० हून अधिक मते मिळाली. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या महाराष्ट्रातील ५५ टक्के नागरिकांनी आपले काम पूर्ण करण्यासाठी लाच दिल्याचे सांगितले तर त्यापैकी २९ टक्के लोकांनी अनेकदा लाच दिली (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या) तर २६ टक्के लोकांनी एकदा किंवा दोनदा (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या) लाच दिली. १८ टक्के लोक म्हणाले की त्यांनी लाच न देता काम केले. गेल्या वर्षभरात ही भ्रष्टाचाराच्या घटनांमध्ये वाढ असल्याचे दिसून आले आहे.

यामध्ये २८ टक्के लोकांनी मनपा विभागात लाच दिली आहे. तसेच २३ टक्के लोकांनी पोलिसांना लाच दिली तर २२ टक्के लोकांनी इतरांना लाच दिली. यामध्ये विद्युत मंडळ, परिवहन कार्यालय, कर कार्यालय इत्यादी विभाग येतात. गेल्या वर्षाच्या तुलनेत पोलिस भ्रष्टाचाराच्या घटनांमध्ये किंचित वाढ झाली आहे, तर महानगरपालिका व मालमत्ता भ्रष्टाचारात वाढ झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com