Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक, मालेगाव महापालिका रेड झोनमध्ये; उर्वरीत संपूर्ण जिल्हा नाॅन रेड झोनमध्ये; असे...

नाशिक, मालेगाव महापालिका रेड झोनमध्ये; उर्वरीत संपूर्ण जिल्हा नाॅन रेड झोनमध्ये; असे आहेत नवे निकष

जिल्ह्यात १८६ कंटेंनमेंट झोन : जिल्हावासियांना दिलासा

नाशिक। प्रतिनिधी

राज्य सरकारने चौथ्या लाॅकडाऊन टप्प्यात नवीन मार्गदर्शकतत्वे जाहीर केली आहेत. नव्या नियमानुसार राज्यात कंटेंटमेंट झोन, रेड आणि नॉन रेड हे झोन ठेवण्यात आले आहेत. त्यानूसार नाशिक जिल्ह्यात ११९ कंटेंटमेंट झोन अाहे. तर नाशिक व मालेगाव महापालिका हे रेड झोनमध्ये असून उर्वरित संपूर्ण जिल्हा हा नाॅन रेड झोनमध्ये ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

त्यामुळे नाॅनरेड झोनमध्ये दैंनदिन व्यवहार व आर्थिक उलाढाल गतिमान होणार असून जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढे राज्यासह जिल्ह्यात दोनच झोन असणार असून ग्रीन आणि र्आरेंज झोन रद्द करण्यात आले आहेत.दोन्ही झोनमध्ये कन्टेन्मेंट झोन असणार आहे.

रात्रीची संचारबंदी

– संध्याकाळी 7 ते सकाळी 7 सर्व सेवा बंद राहणार
– अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बाहेर पडायला मज्जाव
– 65 वर्षांवरील वृद्ध, गरोदर महिला, इतर आजार असलेल्या व्यक्ती, 10 वर्षांखालील मुलं यांनी घरीच थांबावे, वैद्यकीय कारणासाठीच घराबाहेर पडावे

रेड झोनमध्ये काय सुरू राहणार

– अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने

– दारूच्या होम डिलिव्हरी करता येणार
– टॅक्सी, रिक्षा सेवा बंद राहणार
– चार चाकीमध्ये 1+ 2 आणि
-दुचाकीवर एकालाच परवानगी
– मॉल्स, परवानगी नसलेली दुकाने, परवानगी नसलेली इतर आस्थापने साफसफाईसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळात सुरू ठेवू शकतात
– .दस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरू

– विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी 5 टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी.

नॉन रेड झोनमध्ये काय नियम

– स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्टेडियम, खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी सुरू राहणार, पण सामुहिक जमावाला बंदी

– ,आंतरजिल्हा बससेवा 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यास परवानगी.

– सर्व दुकाने आणि बाजारपेठा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत सुरू राहणार, मात्र गर्दी झाल्यास हे बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते.

– सलून सुरु करण्यास परवानगी

काय बंद राहणार

– ट्रेन, मेट्रो, विमान सेवा सर्वच झोनमध्ये बंद राहणार,आंतरराज्य रस्ते वाहतूक बंदच राहणार
– शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, हॉटेल, मॉल, प्रार्थनास्थळे, बंदच राहणार.

- Advertisment -

ताज्या बातम्या