Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिक @१२.६ अंश सेल्सियस; वाढलेल्या गारठ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

नाशिक @१२.६ अंश सेल्सियस; वाढलेल्या गारठ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

नाशिक | प्रतिनिधी 

अचानक वातावरणात आज बदल झाला आहे. नाशिकचे किमान तापमान आज अचानक घटले असून १२.६ अंशावर स्थिरावले आहे. राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद महाबळेश्वरसोबतच नाशिकमध्ये होत असते. त्यामुळे या काळात आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्याचा सल्लाही वैद्यकीय अधिकारी देत असतात.

- Advertisement -

अचानक वाढलेल्या थंडीमुळे शरीरात पाणी पिण्याची गरज कमी होते. अनेकांना गारठ्यात पाण्याची तहान लागत नाही. अनेकदा थंड पाणी प्यायल्याने डीहायड्रेशन होण्याची भीती असते. यामुळे तापमान आणि शरीरातील पाणी यास नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात ८-१० ग्लास पाणी दररोज पिणे स्वाभाविक असते. परंतु हीच परिस्थिती गर्थ्य्त नसते. तहान तापमानासाठी महत्वाची गोष्ट आहे तर डीहायड्रेशन चे संकेत मिळतात.

गारठ्यात किमान ३ ते ४ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. गार पाणी न पिता पाणी कोमट करून प्यायला हव असेही तज्ञ सांगतात.

हिवाळ्यात मुख्यत्वे या वेळी पाणी प्यावे

१. सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायल्यास शरीरातील अवयव सक्रीय होण्यास मदत होते. पाण्यामुळे दिवसातील भोजनाच्या पूर्वीचे शरीरात साठलेले विषयुक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.

२. भोजन करण्याच्या तीस मिनिट आधी दोन ग्लास पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते. ध्यानात ठेवा जेवणाच्या पूर्वी आणि नंतर लगेचच पाणी पिऊ नये.

३. अंघोळीच्या आधी एक ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातून कुठल्याही प्रकारचा फ्लुईड लॉस होत नाही.

पाण्याची दिनचर्या अशी हवी

सकाळी ७ वाजता : पहिला ग्लास पाणी प्यावे

सकाळी ९ वाजता : दुसरा ग्लास, नाश्ता केल्यानंतर १ तासानंतर पाणी प्यावे

सकाळी ११.३० वाजता : तिसरा ग्लास दुपारचे जेवण घेण्याआधी अर्धा तास आधी पाणी प्यावे.

दुपारी १.३० वाजता : चौथा ग्लास दुपारचे जेवण झाल्यानंतर दुपारी दीड च्या सुमारास पाणी प्यायला हवे.

दुपारी ३ वाजता : पाचवा ग्लास चहा घेण्याच्या वेळी एक ग्लास पाणी घ्यावे

सायंकाळी ५ वाजता : सहावा ग्लास यावेळी प्यायल्याने रात्रीच्या जेवणावेळी होणारे ओव्हरइटिंग होणार नाही.

रात्री आठ वाजता : सातवा ग्लास : रात्री जेवणाच्या १ तासांनी पाणी प्यावे.

रात्री दहा वाजता : आठवा ग्लास झोपण्याच्या १ तास आधी पाणी प्यावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या